वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्याविरुद्ध अवमान कारवाईची मागणी करणाऱ्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दुबे यांनी अलिकडेच ‘सर्वोच्च न्यायालय देशाला अराजकतेकडे नेत आहे’ आणि ‘देशातील यादवी युद्धासाठी सरन्यायाधीश संजीव खन्ना जबाबदार आहेत’ असे वक्तव्य करून वाद निर्माण केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर अॅड. विशाल तिवारी यांनी दुबे यांच्याविरुद्ध अवमान कारवाईची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. यासोबतच, नवीन वक्फ कायद्यावर द्वेष पसरवणे आणि भडकाऊ भाषणे थांबवण्यासाठी गृह मंत्रालयाला सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना सल्लागार जारी करण्याचे निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली आहे.









