जानेवारी महिन्यातील लौकिक मुहूर्त आणि इतर माहिती
क्र. विशेष तारीख
1 शुभ दिवस 1, 2 (स 8 प), 3 (दु 4 नं)4, 5, 6 (दु 3 नं) 7 (स 9 प), 9, 10 (दु 12 नं),11, 12, 13 (सा 6 प),14, 15, 17 (सा 7 नं), 18 (सा 5 प),22, 24, 25 (दु 1 नं), 26, 27, 28 (स 9 नं), 29, 31
2 अशुभ दिवस 16, 19, 20, 21, 23, 30
3 अनिष्ट दिवस 19, 21, 23, 30
4 सण/ उत्सव/ विशेष तिथी 2 – पुत्रदा एकादशी, 3- सावित्री बाई फुले जयंती, 10- अंगारकी संकष्टी, 14- भोगी, 15- मकर संक्रांत, 18- एकादशी, 22- कलावती देवी सप्ताह (बेळगाव), 25- श्री गणेश जयंती, 26- प्रजासक्ताक दिन, 28- रथ सप्तमी
5 अमावास्या 20 उत्तर रात्री 6.19 पासून 21 उत्तर रात्री 2.24 पर्येंत
6 पौर्णिमा 5 उत्तर रात्री 2.15 ते 6 अत्तर रात्री 4.38 पर्येंत (शाकंभरी पौर्णीमा)
7 साखरपुडय़ाचे मुहूर्त 1, 4, 5, 10, 13, 14, 22, 26, 27, 31
8 बारसे (नामकरण) मुहूर्त 1- दु 12.30 प, 4, 8 स 10 नं, 13 सायं 6 प, 18- सायं 7 प, 26 स 10.15 प, 27
10 जावळाचे मुहूर्त 1, 5, 22, 27
11 भूमिपूजन/ पायाभरणीचे मुहूर्त 25, 26
12 पाया खणणे मुहूर्त 1 – दु 1 नं, 9, 11- दु 2.30 नं, 12- दु 4.30 प, 29 स 9 प
13 गृहप्रवेशाचे मुहूर्त (व्यावहारिक मुहूर्त) 1, 4, 7, 13, 14, 18, 26, 27, 28
14 वास्तू शान्तीचे मुहूर्त 1- दु 1 प, 4, 7 – स 9 प, 13, 14, 18 सायं 5 प
15 व्यापार सुरु करण्याचे मुहूर्त 1 दु 12.30 प, 4, 8 स 10 नं, 13 सायं 5 प, 26 स 10.15 प, 27
16 वाहन खरेदीचे मुहूर्त 4, 8 स 10 नं
17 शेत जमीन/जागा/ प्रॉपर्टी/फ्लॅट खरेदीसाठीचे मुहूर्त 11 – दु 3.35 नं, 12- दु 2.25 प, 18 दु 4 प, 25 दु 3.30 नं
18 शेतीच्या कामांसाठी उपयुक्त दिवस 1, 9, 11- दु 2.30 नं, 12 – दु 4.30 प, 16, 19, 25, 29
19 डोहाळे मुहूर्त 1, 4, 5, 22, 27
20 पंचक 23 जानेवारी – सोमवार दुपारी 1.54 पासून 27 जानेवारी – शुक्रवार सायंकाळी 6.37 पर्यंत
विशेष सूचना- वरील मुहूर्त आणि इतर माहिती ही वेगवेगळय़ा पंचांगांच्या आधारे आणि स्वानुभवाने दिलेली आहे. लौकिक मुहूर्त म्हणून याकडे बघावे. विवाह आणि उपनयन याचे मुहूर्त दिलेले नाहीत कारण पत्रिकांचा सखोल अभ्यास करून हे मुहूर्त काढावेत असे माझे मत आहे.
मेष
येणारे काही दिवस तब्येतीला सांभाळा. दुर्लक्ष केल्याने मोठे नुकसान होऊ शकते. धनप्राप्ती उत्तम असेल. कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळेल. प्रवासातून फायदा होईल. प्रेमप्रसंगात यश मिळेल. कलाकार आणि खेळाडूंना चांगले दिवस आहेत. नोकरीमध्ये बरोबर काम करणाऱया लोकांशी सावधानतेने वागावे. काही लोक त्रास देऊ शकतात. वैवाहिक जीवनामध्ये थोडे वाद-विवाद होतील.
उपाय मंदिरामध्ये बदाम दान करावे
वृषभ
एखाद्या मानसिक त्रासातून सुटका मिळेल. कुटुंबात वाद-विवाद झाल्याने मन उदास होऊ शकते. छोटे-मोठे वाद मोठे स्वरूप घेऊ शकतात. विनाकारण पैसा खर्च होऊ शकतो. प्रवास घडेल. प्रेमसंबंधात निराशा हाती येईल. गुंतवणूक सध्या टाळावी. नोकरीमध्ये समाधानकारक यश मिळेल. वैवाहिक जीवनात तणाव असेल. लाभाच्या दृष्टीने उत्तम काळ आहे.
उपाय काळय़ा गाईला चारा घालावा
मिथुन
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवीन संधी मिळाल्यामुळे प्रफुल्लित व्हाल. मित्रांबरोबर वेळ घालवाल. नातेवाईकांमध्ये गैरसमज होऊ शकतो. धनप्राप्ती उत्तम असेल. घरच्या लोकांना मदत कराल. प्रवास टाळावा. कागदपत्रे गहाळ होण्याची शक्मयता आहे. शेजाऱयांशी विवाद संभवतो. जमिनीच्या व्यवहारांमध्ये यश मिळेल. प्रेमसंबंध उत्तम असतील. गुंतवणुकीतून लाभ होईल. नोकरीत मानसिक त्रास संभवतो.
उपाय केसराचा टिळा लावावा
कर्क
प्रयत्नांना यश मिळेल. नाजूक प्रकृतीच्या लोकांनी तब्येतीची काळजी घ्यावी. कौटुंबिक सुख उत्तम असेल. ज्ये÷ व्यक्तींची साथ मिळेल. धनप्राप्ती चांगली असेल. प्रवासातून फायदा होईल. आईच्या तब्येतीची काळजी वाटेल. जमिनीच्या व्यवहारात सध्या यश नाही. प्रेमसंबंधात दृढता येईल. नोकरीत समाधानकारक घटना घडेल. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात. छोटय़ा मोठय़ा अपघातापासून सावध राहावे.
उपाय दत्त दर्शन घ्यावे
सिंह
पोटाच्या तक्रारी आणि मानसिक बेचैनी यामुळे त्रस्त व्हाल. कुटुंबामध्ये छोटेखानी समारंभ होऊ शकतो. पाहुण्यांचे आगमन संभवते. प्रवासाचे उत्तम योग आहेत. वाहन खरेदीचा योग आहे. प्रेमसंबंधांमध्ये दुरावा येईल. छोटय़ा गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्मयता आहे. नोकरीमध्ये बढती किंवा पगारवाढीचे योग आहेत. वैवाहिक जोडीदाराबरोबर आनंदात वेळ घालवाल. देव दर्शनाकरता प्रवासाचे योग आहेत.
उपाय अन्नदान करावे
कन्या
गेल्या काही दिवसांपासून तब्येतीच्या तक्रारी सुरू होत्या त्यापासून सुटका मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कामे करण्यामध्ये हुरूप येईल. पैशांच्या बाबतीत मात्र थोडी निराशा पदरी पडू शकते. कुटुंबातील ज्ये÷ व्यक्तींशी भांडण संभवते. वाहन आणि स्थावर सुख उत्तम असेल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर बाहेर फिरायला जाऊ शकता. नोकरीमध्ये मन लागणार नाही.
उपाय जांभळय़ा रंगाचा हातरुमाल वापरावा.
तूळ
चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे आरोग्य बिघडण्याची शक्मयता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी भांडण होऊ शकते. धनप्राप्ती सहजतेने होणार नाही. प्रवासात त्रास होऊ शकतो. स्थावर मालमत्ता आणि वाहन यासंबंधी व्यवहारात यशप्राप्ती होईल. प्रेमींना अनुकूल काळ आहे. गुंतवणुकीतून लाभ होईल. संततीसंबंधी चिंता मिटेल. नोकरदार वर्गाला उत्तम वेळ आहे. वैवाहिक जीवनामध्ये वादावादीचे प्रसंग येतील.
उपाय देवीला कुंकुमार्चन करा
वृश्चिक
येणारे काही दिवस आरोग्याच्या दृष्टीने तितकेसे चांगले नाहीत. त्यामुळे तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. कुटुंबातील सदस्यांशी वाद-विवाद संभवतो. विशेष कारणाकरता साठवलेले पैसे खर्च करावे लागल्याने चिडचिड होऊ शकते. प्रवासाकरता योग्य वेळ आहे. जमिनीचे व्यवहार सध्या टाळा. नोकरीमध्ये कष्टाचे फळ मिळेल. वैवाहिक सुख उत्तम असेल. तीर्थयात्रा संभवते. कामात यश मिळेल.
उपाय सूर्याला अर्घ्य द्यावे.
धनु
तब्येत सुधारल्यामुळे मन आनंदी असेल. जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न कराल. धनप्राप्तीकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. कुटुंबात वाद विवाद संभवतो. प्रवासात धनहानी होण्याची शक्मयता आहे. कुठेही सही करताना सावध रहावे. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. प्रेमात धोका होण्याची शक्मयता आहे. नोकरीत समाधानी असाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. मानसन्मान मिळेल.
उपाय हिरव्या शाईने 379 हा आकडा मनगटावर लिहा
मकर
मिथुन आरोग्याचा पाया म्हणावा तसा बळकट नाही त्यामुळे बाहेरचे खाणे टाळावे. मानसिक ताण तणाव संभवतो. धनप्राप्ती उत्तम असेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रवास शक्मयतो टाळावा. वाहनासंबंधी तक्रार येऊ शकते. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. प्रेमसंबंध बळकट होतील. नोकरीत वरि÷ांची मर्जी संपादन करावी लागेल. वाहन चालवताना सावध राहण्याची गरज आहे.
उपाय हिरव्या रंगाची काचेची गोटी जवळ ठेवावी.
कुंभ
तब्येत उत्तम असेल. घरच्यांसाठी इतरांशी बोलणी कराल. पैशांच्या बाबतीमध्ये काही दिवस सावधान राहण्याची गरज आहे. एखादी परकीय व्यक्ती फसवू शकते. कुटुंबामध्ये वादविवाद होण्याची संभावना आहे. प्रवास घडेल. भावंडांचे सुख मिळेल. घरातील डागडुजीकरता खर्च कराल. मातृतुल्य व्यक्तीशी वादविवाद होण्याची शक्मयता आहे. प्रेम संबंधांमध्ये दुरावा संभवतो. नोकरीत यश मिळेल.
उपाय लहान मुलीला पांढरे पुष्प द्यावे
मीन
येणारा काळ हा कौटुंबिक सुख आणि समाधानाने परिपूर्ण असणार आहे. धनप्राप्ती उत्तम असेल. पैसा टिकवण्यासाठी प्रयत्न कराल. छोटे-मोठे प्रवास टाळण्यामध्येच शहाणपण आहे. वाहन आणि स्थावर सुख उत्तम असेल. प्रेम प्रकरणांमध्ये अपमान होण्याची शक्मयता आहे. धोकादायक गुंतवणूक करू नका. नोकरीमध्ये ताणतणावाला सामोरे जाल. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल.
उपाय लाल गाईला गूळ चपाती खायला घालावी.





