मोही येथे शाळेवरील पत्रा उडाला
प्रतिनिधी/ सातारा
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सातारा जिह्यातील वातावरण मंगळवारी दुपारी बद्दलले होते. पावसासारखे वातावरण तयार झाले होते. जावळी, वाई, सातारा, कोरेगाव तालुक्यातील काही भागात हलकासा शिडकावा झाल्याचे स्थानिकानी सांगितले. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. दरम्यान, माण तालुक्यातील मोही येथे वाऱयाने शाळेवरचा पत्रा उडाल्याची घटना घडली.
जिह्यातील वातावरण हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुपारी बदलले. आकाशात ढग जमले. वायाचा वेग काही ठिकाणी वाढला होता. सातारा तालुक्यातील काही भागात तसेच वाई तालुक्यातील पाचवड, भुईंज, जोशी विहीर, व्याहळी, आसले, कडेगाव, जावळी तालुक्यातील सायगाव, महिगाव या परिसरात हलकासा पावसाचा शिडकावा झाला. या पावसामुळे शेतकयांची पळापळ झाली. शेतीत काढणीची व कडबा गोळा करण्याची कामे सुरू आहेत. तसेच कोरेगाव तालुक्यातील काही भागात पावसाचे चित्र झाले होते. माण तालुक्यातील मोही येथील कन्या शाळेवरील पत्रे उडाले. जिह्यात इतर कुठं नुकसान झाल्याचे ऐकिवात नाही.









