बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील गुडस येथे 23 गुंठे गायरान जमीन आहे. येथून मेंढ्या व जनावरांना चारा उपलब्ध होतो. मात्र सदर जमीन खासगी व सरकारच्या कोणत्याही विभागाला हस्तांतरित करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. गुडस येथील सर्व्हे क्र. 401 मधील 258 ए मध्ये 23 गुंठे जमीन आहे. मात्र ही जमीन येथील जनावरे व मेंढ्यांना चरण्यासाठी पोषक असून येथून मुबलक प्रमाणात जनावरांना चारा उपलब्ध होतो. मात्र सदर जमीन खासगी व्यक्तींना किंवा सरकारच्या ताब्यात देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. याला विरोध करत ग्रामस्थांनी अनेकवेळा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले. प्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र याकडे कानाडोळा करण्यात येत आहे..
Previous Articleनारायण म्हैसूर यांची विधानपरिषद सदस्यपदी नियुक्ती करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









