वृत्तसंस्था/ भोपाळ
भोपाळच्या शुटींग अकादमी संकुलात सुरु असलेल्या चौथ्या राष्ट्रीय निवड चाचणी शॉटगन नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप नेमबाजी प्रकारात टी. पृथ्वीराज आणि राजेश्वरी कुमारी यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या विभागात विजेतेपद मिळविले.

पुरुष विभागात तामिळनाडूच्या टी. पृथ्वीराजने 50 पैकी 46 अचूक शॉट्स नोंदवित विजेतेपद पटकाविले. तर महिलांच्या विभागात पंजाबच्या राजेश्वरी कुमारीने 48 पैकी 48 शॉट्स नोंदवित जेतेपद हस्तगत केले. गुजरातचा बक्तियार उदीन मलिक आणि उत्तर प्रदेशची सबिरा हॅरिस यांनी अनुक्रमे कनिष्ठांच्या पुरुष आणि महिला ट्रॅप नेमबाजी निवड चाचणीत प्रथम स्थान मिळविले.









