रिसालदार गल्लीतील ब्लॅक स्पॉट निर्मूलनासाठी प्रयत्न
बेळगाव : रिसालदार गल्लीतील महिला आघाडी हॉटेलसमोरील ब्लॅक स्पॉट निर्मूलनासाठी महापालिकेने त्या ठिकाणी झाडाच्या कुंड्या ठेवल्या आहेत. हा परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणी चुना टाकून त्यानंतर कुंड्या ठेवल्या आहेत. आता तरी जनता या ठिकाणी कचरा टाकण्याचे बंद करणार काय? हे पहावे लागेल. शहरामध्ये दोन वेळा कचरा गोळा करण्यासाठी मनपा वाहने पाठवत आहे. घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा केला जात आहे. तरीदेखील जनता व व्यावसायिक कचरा फेकून देत आहेत. त्यामुळे कचऱ्याचे ढीग पडून आहेत. रिसालदार गल्लीतील या ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी कायमच कचरा पडून होता. त्यामुळे तेथे आता झाडांच्या कुंड्या ठेवल्या आहेत. जनतेला वारंवार आवाहन करण्यात आले आहे की, कचरा घंटागाडीकडेच द्यावा. याचबरोबर ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे द्यावा, असे वारंवार सांगण्यात आले आहे. तरीदेखील शहरामधील जनता रस्त्यावरच कचरा फेकून देत आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेने हे पाऊल उचलले आहे.









