मनपा आयुक्त दुडगुंटी यांची माहिती
बेळगाव : जिल्हा पंचायत व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्तीवर महानगर पालिकेमध्येही नागरिकांसाठी पुस्तके आणि वृत्तपत्रे वाचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मनपाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या खुल्या जागेमध्ये आसन व्यवस्था करण्यात आली असून तेथे बसून वाचन करता येईल, अशी माहिती मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दिली. सध्या येथे वृत्तपत्रासह विविध विषयांवरील पुस्तके आहेत. लवकरच कायद्याची पुस्तकेही येथे ठेवण्यात येतील. ही जागा खुली होती त्या जागेचा सदुपयोग करून येथे पुस्तकाचे रॅक उभे केले असून वाचनाची सोय केली आहे. यासाठी ज्यांना पुस्तके भेट द्यावयाची आहे. त्यांनी पुस्तके द्यावीत, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.









