तरूणांनी नगरपंचायतीत केली चौकशी : काहीजणांकडून अफवा पसरविण्याचा प्रयत्न
वार्ताहर /किणये
बेळगाव शहरालगत असलेल्या पिरनवाडी-मच्छे या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. गेल्या दोन वर्षापासून पिरनवाडी-मच्छे नगरपंचायत म्हणून कामकाज सुरू आहे. असे असतानाच पिरनवाडी नगरपंचायतीला पुन्हा नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. अशी अफवा काहीजणांकडून पसरविण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायत झाल्यास रोजगार हमीची इतर कामे सर्वसामान्य लोकांना देणार, अशी आमिषेही दाखविण्यात येत आहेत. यामुळेच मंगळवारी पिरनवाडीतील काही ग्रामस्थांनी थेट नगरपंचायतीकडे धाव घेऊन याची चौकशी केली. पिरनवाडी नगरपंचायतीला प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही स्वरूपाचा ग्रामपंचायतीचा दर्जा म्हणून आदेश आलेला नाही, अशी माहिती नोडल अधिकारी गोपाळ कासे यांनी आलेल्या ग्रामस्थांना दिली. सध्यातरी पिरनवाडी नगरपंचायत म्हणूनच सर्व कामकाज सुरू आहे, अशी स्पष्ट माहिती अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिली आहे. सदर प्रकाराबाबत विचारपूस करण्यासाठी पिराजी मुचंडीकर, सचिन गोरले, परशराम मुचंडीकर, प्रमोद मुचंडीकर, किरण येळळूकर, मनोहर ब्ंिांदले, राहुल धामणेकर, गणेश आपटेकर आदी उपस्थित होते.
अद्याप कोणतेही आदेश नाहीत

पिरनवाडी नगरपंचायतीला पुन्हा ग्रामपंचायत करण्यात आली आहे. किंवा येणार आहे. अशी अफवा गावात सध्या पसरविण्यात येत आहे. त्यामुळेच आम्ही सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नगरपंचायत अधिकाऱ्यांचीच विचारपूस केली आहे. अद्याप तरी ग्रा.पं.बाबत कोणतेही आदेश आले नाहीत अशी माहिती उपलब्ध झाली आहे. पिरनवाडी नगरपंचायत झाल्यापासून कर भरलेला आहे. नागरिकांनी कोणत्याही भुलथांपाना बळी पडू नये.
-नारायण मुंचडीकर









