चषकासह दुचाकी वाहनाचे बक्षीस : 61 सुवर्णासह एकूण 266 पदकांची कमाई
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
शिमोगा येथे शिमोगा शहर कराटे संघटना आयोजित तिसऱया निमंत्रितांच्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या इंडियन कराटे क्लबने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. त्यांना पल्सर मोटारबाईक देवून गौरविण्यात आले.
शिमोगा येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा युएसएचे गँण्ड मास्टर पेरी मौले, क्मयूसी एम., अल्ताफ पाशा, संयोजक विनोद एस. एल. यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या स्पर्धेत युएसए, नेपाळ, श्रीलंका, भारत व इतर विविध देशातून 3 हजारहून अधिक कराटेपटूंनी भाग घेतला होता. इंडियन कराटे क्लबच्या 154 कराटेपटूंनी भाग घेतला होता.
कटाज व कुमिटे स्पर्धेत एकूण 61 सुवर्ण पदके. 90 रौप्य पदके, 115 कांस्य पदकांची कमाई केली. स्पर्धेचे संयोजक विनोद एस. एल. व युएसएचे ग्रॅण्डमास्टर पेरी मौले तसेच क्मयोसी एम., अल्ताफ या सर्वांनी बेळगावच्या इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे संघटनेचे अध्यक्ष कराटे मास्टर गजेंद्र काकतीकरसह कराटेपटूंना सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक व पल्सर दुचाकी वाहन देवून गौरव केला. यावेळी अभिनेते सुमन तळवार यांच्या हस्ते गजेंद्र काकतीकर यांचा स्मृतीचिन्ह देऊन खास गौरव करण्यात आला. विजेत्या कराटेपटूंना गजेंद्र काकतीकर, हेमलता काकतीकर, विठ्ठल बोजगार, प्रभाकर किल्लेकर, परशराम काकती, निलेश गुरखा, हरिष सोनार, नताशा अष्टेकर, विनायक दंडकर व परशुराम नेकनार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









