वार्ताहर/किणये
बेळगुंदी गावचे जागृत ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिराचा लोकार्पण सोहळा गुरुवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. यानिमित्त भाविकांचा जनसागर लोटला होता. दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी दिसून आली. मरगाई मंदिर देवस्थान परिसरात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रवळनाथ मंदिराचा लोकार्पण सोहळा चार दिवसांपासून सुरू आहे. गुरुवारी सकाळी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते फीत कापून मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रामस्थ पंच कमिटी अध्यक्ष दयानंद गावडा होते. युवराज कदम, चेन्नय्या संगळमठ, अडत व्यापारी अशोक गावडा, भारत दूध डेअरीचे संचालक शरद पाटील, उद्योजक यल्लाप्पा ढेकोळकर, निंगाप्पा मोरे, उद्योजक शिवाजी बेटगेरीकर, ग्रा. पं. अध्यक्ष प्रताप सुतार, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर ज्योतिबा भगरे, दत्ता पाटील, आनंदा जाधव आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
रवळनाथ मंदिर ग्रामस्थ पंच कमिटी व नागरिकांच्या एकजुटीचे कौतुक मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी आपल्या भाषणातून केले. लोकार्पण सोहळ्यात माजी आमदार संजय पाटील, भाजपाचे विनय कदम, म. ए. समितीचे आर. एम. चौगुले, माजी महापौर शिवाजी सुंठकर, पुंडलिक पावशे यांनी मंदिराच्या कामकाजाबद्दल गौरवोद्गार काढले. गुरुवारी सकाळी मंदिर उद्घाटनानंतर भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. दर्शनासाठी ग्रामस्थ पंच कमिटीच्यावतीने विशेष सोय करण्यात आली होती. मरगाई देवस्थान परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थ कमिटीचे अध्यक्ष दयानंद गावडा, शिवाजी बोकडे, रामचंद्र पाटील, यल्लाप्पा शहापूरकर, कल्लाप्पा बिजगर्णीकर सुरेश पाऊसकर, अशोक पाटील, किरण मोटणकर, आप्पाजी शिंदे, नामदेव बाचीकर, कृष्णा गावडा, यल्लाप्पा बाचीकर, अशोक आमरोळकर, धुळाप्पा पाटील, परशराम शहापूरकर, सूर्यकांत चौगुले, महादेव बोकमूरकर, तुकाराम चव्हाण, खेमानी तलवार, नामदेव गुरव आदी उपस्थित होते.
एकात्मतेचे दर्शन
लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून गावात एकात्मतेचे दर्शन घडले. साडेआठ हजार लोकवस्तीच्या या गावातील नागरिकांमध्ये एकोपा असल्याचे दिसून आले.









