कोल्हापूर / संतोष पाटील :
मागील चार दशकापासून अंबाबाई मंदिर विकास आराखडा पूर्णत्वास जाण्याचे कोल्हापूरकर स्वप्न पहात आहेत. कोल्हापूरचे धार्मिक महत्व अधोरेखित करणारे अंबाबाई मंदिर परिसर पायाभूत सुविधांची वाणवा आणि समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या अंबाबाई मंदिरात भाविकांसह कोल्हापूकरांना होणारा त्रास 1400 कोटी रुपयांच्या तीन टप्प्यातील विकास आराखड्याने कमी होण्याची शक्यता आहे. प्राथमिक टप्प्यात असलेला हा आराखडा येत्या वर्षभरात प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. कोल्हापूरच्या धार्मिक, पर्यटन वाढीत मैलाचा दगड ठरण्राया या आराखड्याची इंतभूत माहिती ‘तरुण भारत संवाद’ च्या वाचकांसाठी….
भूसंपादनाचा खर्च: 929.23 कोटी रुपये
बांधकामासाठीचा खर्च: 435.54 कोटी रुपये
एकूण खर्च: 1364.77 कोटी रुपये
- पुनर्विकास प्रकल्पातील सुविधा
दर्शनरांगेची सुधारणा
पार्किंग सुविधा
प्रमुख मार्गांचे बांधकाम.
इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट
माहिती केंद्र, स्वच्छतागृहे, आणि भाविकांसाठी विश्रामगृहे.
- पुनर्विकासाचे प्रमुख फायदे
1. सुविधाजनक आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था
2. दर्शनरांगेच्या व्यवस्थेमुळे एकाच वेळी साडेपाच हजार भाविकांची सोय
3. पर्यटन वाढीमुळे मंदिर परिसरासह कोल्हापूरच्या अर्थकारणाला गती
4. पुरेशी पार्किंगची सोय
5. मंदिर परिसरात पायाभूत सुविधा
6. अन्नछत्र आणि वेद पाठशाळेमुळे धार्मिक शिक्षणाची सोय होईल.
7. बिनखांबी गणपती मंदिर परिसरात सुविधाजनक आणि आनंददायी प्रवेश
8. अंतर्गत रस्ते आणि लँडस्केपिंगमुळे सुसंनियोजित परिसर
9. कोल्हापूरचा सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून विकसित होण्यास हातभार
10. किरणोत्सव मार्गातील अडथळे होणार दूर
11. मंदिर परिसर सर्व बाजूंनी दृष्टिपथात परिसराचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल.
- टप्पा 1
आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी 421 कोटी 33 लाख खर्च येणार आहे. दक्षिण बाजू बिनखांबी मंदिर ते विद्यापीठ हायस्कूल परिसरात 45 मिळकती येतात. याचे मिळकत पत्रिकेवरील क्षेत्र 6688.30 चौमी आहे. यामध्ये 57 दुकाने आणि 19 रहिवास आहेत. असेसमेन्टनुसार दुकानांचे क्षेत्र 5833.8 तर रहिवास क्षेत्र 8336.15 चौमी इतके आहे. मणकर्णिका कुंडपरिसरात 11 मिळकतीचे क्षेत्र 854.10 चौमी आहे. यामध्ये 37 दुकानांचे असेसमेन्टनुसार क्षेत्र 1339.83 चौमी तर तीन रहिवासी क्षेत्र 225.83 असे असेसमेन्टनुसार क्षेत्र 1564.9 चौमीटर आहे. महाव्दारोड समोरील दोन्ही बाजुला 35 मिळकती आहेत.मिळकत पत्रिकेनुसार क्षेत्र 1120.30 चौमीटर असून असेसमेन्टनुसार 12 दुकानांचे क्षेत्र 404.22 चौमी तर रहिवास क्षेत्र 1053 चौमी असे एकूण 1457.26 चौरस मीटर आहे.
खर्च (कोटी रुपये)
भूसंपादनाचा खर्च: 257.94
बांधकामासाठीचा खर्च: 163.39
एकूण खर्च: 421.33
भूगर्भीय लोअर लेवल प्लाझा एक प्रस्तावित सुविधा :
टॉयलेट ब्लॉक: स्त्रिया आणि पुरुषांसाठी प्रत्येकी दहा टॉयलेट्स.
लॉकर रूम, चप्पल स्टँड, आणि पिण्याचे पाणी
28 दुकानांचा समावेश.
आच्छादित सभामंडप आणि दर्शनरांग:
एक हजार भाविकांसाठी बैठक व्यवस्थेसह चार सभामंडप (प्रत्येकी 325 ते 474 क्षमता ).
चार हजार भाविकांसाठी दर्शनरांग (प्रत्येकी एक हजार क्षमतेचे चार हॉल).
एकूण क्षमता: पाच हजार भाविक.
सभामंडप आणि दर्शनरांगेत टॉयलेट्सची सोय.
अँफिथिएटर स्टेज आणि समोर प्लाझा व लँडस्केपिंग
माहिती केंद्र आणि सुरक्षा विभाग ऑफिस
ऐतिहासिक मंदिरांचा जीर्णोद्धार
भूस्तरीय मजला अप्पर लेवल प्लाझा एक
प् सुविधा:
पार्किंग: 50 चारचाकी वाहने आणि केएमटी बस थांब्यासाठी पार्किंगची सोय.
लोअर प्लाझा आणि पार्किंगसाठी विविध ठिकाणी ड्रॉप ऑफ पॉईंट
भूगर्भीय मंदिरांसाठी प्रवेश मार्ग
- टप्पा 2
टप्पा दोनसाठी एकूण 375.11 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये पूर्व भाग (शेतकरी संघ, सरलष्कर भवन व इतर इमारती) मिळकतींची संख्या 17 आहेत. मिळकत पत्रिकेवर 4021.52 चौरस मिटर आहे. असेसमेन्ट नंबरनुसार दुकाने 93 आणि रहिवास 22 आहेत. यांचे असेसमेन्टनुसार दुकानांचे क्षेत्र 7205.62 चौमी तर रहिवास क्षेत्र 1920 चौमी आहे.
खर्च (कोटी रुपये)
भूसंपादनाचा खर्च: 281.80
बांधकामासाठीचा खर्च: 93.31
एकूण खर्च: 375.11
भूगर्भीय लोअर लेवल प्लाझा दोन प्रस्तावित सुविधा :
पार्किंग: 181 दुचाकी आणि 90 चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सोय.
61 दुकानांचा समावेश.
भूस्तरीय अप्पर लेवल प्लाझा दोन प्रस्तावित सुविधा :
पोलीस चौकी आणि ड्रॉप ऑफ पॉईंट
32 दुकानांचा समावेश.
पार्किंग: चार बसेस आणि रिक्षा स्टँडसाठी पार्किंगची सोय.
आउटडोअर गॅलरी आणि हेरिटेज वॉल
पिण्याच्या पाण्याची सोय
हेरिटेज कोर्टयार्ड :
हेरिटेज प्लाझा: लाइट आणि साउंड शो
मल्टिपर्पज हॉल आणि प्रदर्शनी हॉल
अन्नछत्र आणि वेद पाठशाळा
भोजनगृह आणि संलग्न स्वयंपाकघर
टॉयलेट ब्लॉक: स्त्राrया आणि पुरुषांसाठी प्रत्येकी चार टॉयलेट.
पहिल्या मजल्याचा प्रस्तावित आराखडा : हेरिटेज कोर्टयार्ड
पहिला मजला सुविधा प्रस्तावित सुविधा :
भोजनगृह आणि संलग्न स्वयंपाकघर
टॉयलेट ब्लॉक: स्त्राrया आणि पुरुषांसाठी प्रत्येकी चार टॉयलेट.
दुकाने: 32 दुकाने
आउटडोअर गॅलरी आणि हेरिटेज वॉल
- मंदिर परिसराची मर्यादा
श्री अंबाबाई मंदिर आणि जुना राजवाडा हे कोल्हापूर शहराच्या केंद्रस्थानी आहेत. या परिसराची मर्यादा खालील तीन मुख्य रस्त्यांनी निश्चित केली जाते. पश्चिमेला: महाद्वार रोड, दक्षिणेकडील: बिनखांबी गणेश मंदिर रस्ता, उत्तरेकडील: ज्योतिबा रस्ता, या मर्यादेमुळे मंदिर परिसराला एक विशिष्ट भौगोलिक व्याप्ती प्राप्त झाली आहे, ज्यामुळे पुनर्विकासाचे नियोजन करणे सोयीचे झाले आहे.
- प्रस्तावित क्षेत्रांचा तपशील
आराखड्यामध्ये खालील क्षेत्रांचा समावेश आहे: (क्षेत्र चौरसमीटरमध्ये)
मंदिर हद्द : 45274
भूसंपादन क्षेत्र : 7800
हेरिटेज प्लाझा आणि कोर्टयार्ड : 18392
महापालिका क्षेत्र : 7800
नव्याने विकसित होणारे क्षेत्र : 11282
- भाविकांची वाढती संख्या, पुनर्विकासाची गरज अधोरेखित
अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येण्राया भाविकांच्या संख्येत 2022 ते 2024 या कालावधीत साधारण तीन लाख भाविकांची संख्या वाढली आहे. या वाढत्या संख्येमुळे मंदिर परिसरातील सध्याच्या सुविधांवरील ताण आणि पुनर्विकासाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. सुनिल पाटील असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी सादर केलेल्या पुनर्विकास आराखड्यामुळे या समस्यांवर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे.
भाविकांच्या संख्येत वाढ
2022 : 92 लाख 12 हजार 432
2023 : 10 लाख 90 हजार 735
2024 : 12 लाख सहा हजार
भाविकांसमोरील अडचणी
दर्शनरांगेची अपुरी व्यवस्था
पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि स्वच्छतागृहांची वाणवा
तासंतास दर्शन रांगेत थांबावे लागते, विश्रांतीची सोय नाही
प्रथमोपचार, आपत्कालीन वैद्यकीय सेवा नाहीत.
- टप्पा 3
असे असेल पार्कींग व्यवस्था
आराखड्यामध्ये भूगर्भीय आणि भूस्तरीय मजल्यांवर पार्कींग व्यवस्था करण्यात येणार आहे. भूगर्भीय मजल्याचा प्रस्तावित आराखडा : लोअर लेवल प्लाझा एक
सुविधा आणि पार्किंग व्यवस्था भूगर्भीय मजला:
चारचाकी : 279
दुचाकी : 733
मिनी बस : तीन
भूस्तरीय मजला:
दुचाकी : 53
रिक्षा : 15
बस : 7
एकूण:
चारचाकी : 279
दुचाकी : 786
रिक्षा : 15
बस : 7
नमी बस :3
अशी असेल दुकानांची व्यवस्था
भूगर्भीय मजला : 109
भूस्तरीय मजला : 78
पहिला मजला : 78
दुसरा मजला : 32
एकूण मजले : 297
अप्पर लेवल प्लाझा एक सुविधा :
पार्किंग: 41 दुचाकी आणि तीन बसेससाठी पार्किंगची सोय.
टॉयलेट ब्लॉक: चार स्त्रिया आणि पुरुष टॉयलेट्स.
लॉकर रूम, पोलीस स्टेशन, आणि पिण्याच्या पाण्याची सोय
दुकाने: 46 दुकानांचा समावेश.
ऑफिसेस, प्रथमोपचार केंद्र.
रिक्षा स्टँडची सोय.
लोअर प्लाझा आणि पार्किंगसाठी ड्रॉप ऑफ पॉईंट
पहिल्या मजल्याचा प्रस्तावित आराखडा
दुकाने: 46 दुकानांचा समावेश.
दुस्रया मजल्याचा प्रस्तावित आराखडा
सेवास्थान समिती ऑफिस: मंदिर व्यवस्थापनासाठी ऑफिस.
बँक: भाविक आणि स्थानिकांसाठी बँकेची सुविधा.
खर्च (कोटी रुपये)
भूसंपादनाचा खर्च : 389.49
बांधकामासाठीचा खर्च : 178.84
एकूण खर्च : 568.33
तिस्रया टप्प्यात 93 मिळकती होतात बाधित
- मंदिर परिसराचा सुनियोजित विकास होईल
श्री क्षेत्र अंबाबाईचे मंदिर हे कोल्हापूरची धार्मिक ओळख आहे. अंबाबाई मंदिर परिसराचा सुनियोजित विकासाची गरज आहे. येथे येण्राया भाविकांना पायाभूत सुविधा देत असताना स्थानिकांनाही त्याचा लाभ झाला पाहिजे. सर्वसमावेशक आणि सर्व घटकांना सामावून घेणारा सर्व अंगानी परिसराचा विकास होवून भाविकांना सुविधा मिळतील. कोणावरही अन्याय होणार नाही असाच हा विकास आराखडा तयार केला आहे.
अमोल येडगे, जिल्हाधिकारी
- दिर्घकालीन विचार करुन आराखडा
कोल्हापूरच्या मध्यवस्तीत अंबाबाई मंदिर असल्यने दाटीवाटीमुळे भाविकांसह शहरवासीयांची गैरसोय होत आहे. मंदिर परिसराचा विकास करताना दिर्घ कालीन उपाययोजनांवर भर दिला आहे. आराखडा तयार करताना अंबबाबाई मंदिर परासराचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्वाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली आहे. अंबाबाई विकास आराखडा कोल्हापूरच्या विकासात मैलाचा दगड ठरेल
सुनिल पाटील (आर्किटेक्ट)
- शासनस्तरावर पाठपुरावा करणार
अंबाबाई मंदिराचा आराखडा पूर्ण व्हावा ही कोल्हापूरकरांची अनेक वर्षांची इच्छा आहे. भाविकांना सोयीसुविधा देत असताना येथील स्थानिकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. आराखड्याचे काम शक्य तितक्या लवकर सूरू होवून पूर्णत्वास जावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करु
प्रकाश आबिटकर, पालकमंत्री
- निधी कमी पडू देणार नाही
कोल्हापूर शहराचा आमदार म्हणून अंबाबाई आराखडा पूर्ण व्हावा ही नेहमीच इच्छा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे सातत्याने यासाठी पाठपुरावा केला होता. अंबाबाई विकास आराखड्यास निधी कमी पडू देणार नाही. आराखडा निर्धारीत येळेत आणि दर्जेदार व्हावा यासाठी लक्ष देवू
राजेश क्षीरसागर, आमदार








