जुन्या संसद भवनाचे उद्घाटन 18 जानेवारी 1927 रोजी ल इरविन यांनी केले होते आणि तेव्हा याला सेंट्रल असेंबली म्हटले जात होते. 8 एप्रिल 1929 रोजी भगत सिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी यात बॉम्ब फेकून ब्रिटनपर्यंत खळबळ उडवून दिली होती.
राज्यघटनेची निर्मिती
देशाच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी प्रदीर्घ चर्चा याच जुन्या संसद भवनात झाली होती. 26 जानेवारी 1950 रोजी ही राज्यघटना लागू झाली होती आणि डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी पहिले राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला. जुने संसद भवन 1921 पासून 1927 पर्यंत निर्माण करण्यात आले होते. 18 जानेवारी 1927 आणि 15 ऑगस्ट 1947 दरम्यान हे इंपीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल म्हणून कार्यरत होते. यानंतर 15 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी 1950 दरम्यान भारताची संविधान सभा आणि मग संसद ठरले.
105 घटनादुरुस्ती
जुन्या संसद भवनात 150 घटनादुरुस्ती मंजूर झाल्या. 18 जून 1951 रोजी कलम 15, 19, 85, 87, 174, 176, 341, 342, 372 आणि 376 मध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली. कलम 31 अ, 31 ब आणि अनुसूची 9 जोडण्यात आली. घटनेतील 105 वी दुरुस्ती 10 ऑगस्ट 2021 रोजी झाली होती.
आणीबाणीचा साक्षीदार
जुने संसद भवन आणीबाणीचे साक्षीदार देखील आहे. 25 जून 1975 रोजी तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यानुसार कलम 352 च्या अधीन आणीबाणीची घोषणा केली होती. 25 जून 1975 पासून 21 मार्च 1977 पर्यंत आणीबाणी कायम होती.
3 संयुक्त अधिवेशनं
75 वर्षे जुन्या संसद भवनात 3 संयुक्त अधिवेशनंही पार पडली ओत. संसदेचे पहिले संयुक्त अधिवेशन 1961 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांनी हुंडाविरोधी अधिनियमासाठी आयोजित करविले होते. दुसरे संयुक्त अधिवेशन मोरारजी देसाई यांनी बँकिंग सेवा आयोग विधेयकासाठी आयोजित करविले होते. तर 2022 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने दहशतवादविरोधी विधेयकासाठी (पोटा) संयुक्त अधिवेशन आयोजित करविले होते.
2 वर्षांमध्ये 4 पंतप्रधान पाहिले
1996-98 दरम्यान 2 वर्षांमध्ये या जुन्या संसद भवनाने 4 पंतप्रधान पाहिले आहेत. 16 मे 1996 रोजी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले परंतु त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यानंतर 1 जून 1996 रोजी एच.डी. देवेगौडा पंतप्रधान झाले, त्यांचे सरकार कार्यकाळ देखील पूर्ण करू शकले नाही. 21 एप्रिल 1997 रोजी इंद्रकुमार गुजराल पंतप्रधना झाले, त्यानंतर 19 मार्च 1998 मध्ये पुन्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले.
अनेकदा विशेष अधिवेशनांचे आयोजन
?14-15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संसदेचे पहिले विशेष अधिवेशन ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून भारतीयांना सत्ता सोपविण्यासाठी आयोजित करण्यात आले होते.
?8-9 नोव्हेंबर 1962 रोजी भारत-चीन युद्धावर चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले होते. तत्कालीन जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या विशेष विनंतीनुसार हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
?14-15 ऑगस्ट 1972 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रात्रीच्या वेळी अधिवेशन बोलाविले होते. स्वातंत्र्याला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हे अधिवेशन आयोजित झाले होते.
?3-4 जून 1991 रोजी 2 दिवसांचे राज्यसभेचे विशेष अधिवेशन हरियाणात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या चर्चेसाठी बोलाविण्यात आले होते.
?8-9 ऑगस्ट 1992 रोजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी मध्यरात्री हे विशेष अधिवेशन बोलाविले होते. भारत छोडो आंदोलनाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा निर्णय घेण्यात आला होता.
?14-15 ऑगस्ट 1997 रोजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी स्वातंत्र्यदिनाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मध्यरात्री संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविले होते.
?13 मे 2012 : भारीतय संसदेच्या उद्घाटन बैठकीला 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
?26-27 नोव्हेंबर 2015 : 2 दिवसांचे विशेष अधिवेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर याहंच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आले होते.
?30 जून 2017 : जीएसटी लागू करण्यासाठी मोदी सरकारने मध्यरात्री विशेष संसदीय अधिवेशन आयोजित करविले होते. मोदींनी प्रतीकाच्या स्वरुपात घंटी वाजवून देशात जीएसटी व्यवस्था सुरू केली.
?18 सप्टेंबर 2023 : संसदीय लोकशाहीच्या 75 वर्षांच्या कामगिरीवर चर्चा करण्यासाठी आणि नव्या संसद भवनात प्रवेश करण्यासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.









