आमदाराच्या विरोधात नवा एफआयआर
वृत्तसंस्था/ चंदीगड
हरियाणाच्या नूंहमध्ये झालेल्या हिंसेप्रकरणी अटकेत असलेले काँग्रेसचे आमदार मामन खान यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने मामन खान यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आमदार मामन आता नूंह येथील तुरुंगात कैद असणार आहेत.
काँग्रेस आमदार सहकार्य करत नसल्याचा आरोप एसआयटीने केला आहे. मामन खान हे स्वत:च्या जबावावर स्वाक्षरी करण्यास नकार देत आहेत. यामुळे तपास पूर्ण होण्यास अडचणी येत असल्याचे एसआयटी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. न्यायालयाकडे तक्रार केल्यावर एसआयटीने आमदाराच्या विरोधात आणखी एक एफआयआर नोंदविला आहे.









