ओल्डफॅट्स उपविजेता, किरण चव्हाण उत्कृष्ट खेळाडू, युसुफ उत्कृष्ट गोलरक्षक
बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित फॅब लीग 35 वर्षांवरील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ओल्डमंकस एफसीने ओल्ड फॅट एफसीचा 1-0 असा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. किरण चव्हाण याला उत्कृष्ट खेळाडू तर युसुफला उत्कृष्ट गोलरक्षकाने गौरविले. सक्षम स्पोर्ट्स एरेना मैदानावर झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ओल्ड फॅट्सने कॅम्प लेजंटचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात वैभव कामटे व रिचर्ड फ्रान्सीस यांनी गोल केले. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ओल्डमंकसने एसकेएफसीचा 2-1 असा निसटता पराभव केला. ओल्डमंकसतर्फे मुज्जमील तेरणीकर व प्रशांत वांडकर यांनी गोल केले. तर एसकेएफसीतर्फे सचिनने 1 गोल केला. अंतिम सामन्यात अटितटीच्या लढतीत ओल्डमंकस संघाने ओल्डफॅट्सचा 1-0 असा निसटता पराभव केला.
या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. वैभव कामतेच्या पासवर सेव्हिलने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ओल्डफॅट्सने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. स्पर्धेनंतर प्रदीप राऊत, विजय रेडेकर, निलेश साळुंखे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या ओल्डमंकस एफसी व ओल्डफॅट्स संघाला चषक, पदके देवून गौरविले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू किरण चव्हाण, उत्कृष्ट गोलरक्षक युसुफ, उत्कृष्ट मिडफिल्डर मुज्जमील तेरणी, उत्कृष्ट डिफेंडर विनय नाईक, उत्कृष्ट फारवर्ड प्रशांत वांडकर यांना चषक देवून गौरविण्यात आले. पंच म्हणून कौशिक पाटील, शिवम यादव यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी यश सुतार, ओमकार कुंडेकर, विवेक सनदींनी परिश्रम घेतले.









