बेळगाव : बेळगाव-वेंगुर्ला रोडवर अपघाताची मालिकाच सुरू आहे. टमटम रिक्षा पलटी झाल्यानंतर उसाचा ट्रकही पलटी झाला. असे असताना देखील या परिसरातील धोकादायक खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. गांधी चौकपासून जवळच अरगन तलावाच्या दुसऱ्या बाजुला मोठा खड्डा पडला असून त्या ठिकाणी एक लोखंडी पाईपला कपडा बांधण्यात आला आहे. याबाबत जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. वास्तविक वारंवार अपघात झाल्यामुळे तातडीने रस्त्याची दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. तसेच रस्त्याशेजारी असलेले खड्डे देखील बुजविणे गरजेचे आहे. असे असताना केवळ एक लोखंडी पाईप बसवून त्या ठिकाणी कपडा बांधून धोकादायक असल्याचे दाखविण्यात आले आहे. यामुळे वाहनचालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Previous Articleरोहयो कामगारांना शेतीची कामे द्या
Next Article रेशनकार्ड लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपणार?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









