त्तसंस्था / टोकियो
विद्यमान विजेता नीरज चोप्राने येथे सुरू असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये अंतिम फेरी गाठली. त्याने पहिल्याच थ्रोमध्ये त्याने पात्रतेचे अंतर नोंदवत अंतिम फेरीत धडक मारली. गट अ मध्ये 27 वर्षीय नीरजने पात्रता फेरीत पहिल्या थ्रोमध्ये 84.85 मी. अंतरावर भालाफेक केली. भालफेकीला त्यानेच सुरुवात केली आणि पात्रता मिळविल्यानंतर त्याने भालाफेक केली नाही. 84.50 मी. हे पात्रतेचे अंतर गाठणारे किंवा सर्वोत्तम बारा खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. अंतिम फेरी गुरुवारी होणार आहे. चोप्राचा जर्मनीचा स्टार ज्युलियन वेबर, केशॉर्न वॉलकॉट, जॅकुब व्हाल्डेच, सचिन यादव यांचा अ गटात समावेश होता. वेबरने 87.21 मी. भालाफेक करीत अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे.
18 खेळाडूंचा समावेश असलेल्या गट ब मध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीम, अँडरसन पीटर्स, ज्युलियस येगो, लुईझ दा सिल्वा, रोहित यादव, यशविर सिंग, रुमेश पथिरागे यांचा समावेश आहे. बुडापेस्ट येथे झालेल्या मागील स्पर्धेत चोप्राने 88.17 मी. भालाफेक करीत सुवर्ण मिळविले होते तर नदीमने 87.82 मी. अंतर नोंदवत रौप्य व व्हाल्डेचने 86.67 मी. अंतर नोंदवत कांस्य मिळविले होते. सुवर्ण आपल्याकडेच राखणारा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या इतिहासातील तिसरा खेळाडू होण्याचा नीरज प्रयत्न करणार आहे. याआधी झेकच्या जॅन झेलेझ्नी (1993, 1995), पीटर्स (2019, 2022) यांनी हा पराक्रम केला आहे. 2024 पॅरिस ऑलिम्पिकनंतर नीरज व नदीम प्रथमच आमनेसामने आले आहेत. नीरजला पॅरिसमध्ये रौप्य नदीमला सुवर्ण मिळाले होत. त्याची परतफेड करण्याची संधी नीरजला मिळाली आहे. नदीमने पॅरिसमध्ये 92.97 मी. च्या प्रचंड थ्रोसह सुवर्णपदक जिंकले होते तर चोप्राने त्या रात्री 89.45 मी. ची सर्वोत्तम कामगिरी केली होती.









