वार्ताहर /नंदगड
नंदगड येथील दक्षिण प्राथमिक कृषी पत्तीनच्या अध्यक्षपदी पी. एच. पाटील यांची तर उपाध्यक्षपदी पुंडलिक कारलगेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी संचालक राहुल पाटील, दिलीप पाटील, व्यंकट केसरेकर, पार्वती वि. पाटील, रेणुका गुं. हलशीकर, संभाजी पारिश्वाडकर, महादेव पाटील, कृष्णा व•र, अर्जुन खणगावी, चंद्रकांत घाडी आदी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे विकास अधिकारी नवीन हुलकुंद यांनी काम पाहिले. नूतन अध्यक्ष पी. एच. पाटील व उपाध्यक्ष पुंडलिक कारलगेकर तसेच सर्व सदस्यांचे पीकेपीएसचे मॅनेजर मुकुंद पाटील यांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले. उपस्थितांचे आभार क्लार्क श्रीनाथ पाटील यांनी मानले. नूतन उपाध्यक्ष पुंडलिक कारलगेकर म्हणाले, संस्थेच्या सर्व सभासद व संचालकांनी आमच्यावर विश्वास ठेवून निवड केली. त्याबद्दल त्यांच्या विश्वासास पात्र राहून प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. विद्यमान अध्यक्ष पी. एच. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकारकडून येणाऱ्या सर्व योजना संस्थेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे राबवल्या आहेत. त्यांचा लाभही अनेक शेतकऱ्यांना झाला आहे. आमच्या कार्याची पोचपावती म्हणून माझी अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या व संस्थेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा नंदगड व परिसरातील विविध संघ संस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. तर पीकेपीएसच्यावतीने मॅनेजर मुकुंद पाटील यांनी त्यांचा सत्कार झाला.









