भुलथापांना बळी पडू नका : केसीआर
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून राजकीय पक्षांनी स्वत:चे उमेदवार देखील जाहीर केले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी पक्षाचे घोषणापत्र जारी केले आहे. काही वगळता अन्य सर्व वर्तमान आमदार विजयी होणार आहेत. ज्यांना तिकीट मिळाले नाही, त्यांना विधानसभेची उमेदवारीच अंतिम नसून भविष्यात आणखी अनेक संधी मिळतील अशी समजाविले असल्याचे केसीआर यांनी म्हटले आहे.
आमच्या अनेक योजना मागील घोषणापत्रात नव्हत्या, तरीही त्या लागू करण्यात आल्या. तेलंगणा, अन्नपूर्णा योजना, कल्याणलक्ष्मी योजना, रायतु भीमा योजना यांचा यात समावेश आहे. आम्ही राज्याच्या जनतेला दिलेली 99 टक्के आश्वासने पूर्ण केली आहेत. यंदाच्या घोषणापत्रात आसरा योजनेच्या अंतर्गत देण्यात येणारी आर्थिक मदत 2 हजारांवरून वाढवत 3 हजार रुपये करण्याची तरतूद असल्याचे केसीआर यांनी म्हटले आहे.
उमेदवारांनी कुठल्याही चिथावणींना बळी पडून भकडू नये. उमेदवारांनी लोकांसोबत बसून शांततेत चर्चा करावी आणि त्यांच्या समस्या दूर कराव्यात. मागील निवडणुकीत मी दोन उमेदवारांना स्वत:मध्ये बदल करण्याचा आणि लोकांशी संवाद साधण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्यांनी माझ्या सुचनेकडे दुर्लक्ष केले आणि दोघेही पराभूत झाले होते असे केसीआर यांनी म्हटले आहे.
निवडणुकीदरम्यान केसीआर हे एकूण 41 प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. केसीआर हे गजवेल आणि कामारे•ाr या मतदारसंघांमधून निवडणूक लढविणार आहेत. दोन्ही मतदारसंघांमध्ये केसीआर यांच्याकडून 9 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरला जाऊ शकतो.









