वृत्तसंस्था / जालंदर
भारतीय हॉकी क्षेत्रातील ऑलिम्पियन हॉकीपटू मनदीप सिंग आणि उदिता दुहान यांचा विवाह 21 मार्चला होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबिय सदस्यांकडून सांगण्यात आले.
भारतीय हॉकी क्षेत्रामध्ये मनदीप सिंग आणि उदिता दुहान यांनी सातत्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2020 च्या टोकियो आणि 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या भारतीय हॉकी संघामध्ये मनदीप सिंगचा समावेश आहे. मनदीप सिंग हा पंजाब पोलीस खात्यामध्ये डीएसपी पदावर कार्यरत आहे. त्याच प्रमाणे महिला हॉकी संघात हरियाणाची उदिता दुहान ही बचावफळीतील हुकमी हॉकीपटू म्हणून ओळखली जाते.









