प्रतिनिधी/ सातारा
पंढरीची वारी ही सामूहिक लोक जीवनाला वळण देणारा एक सांस्कृतिक लोकप्रवाह आहे ज्ञानियांचे नेय जपकांचे जाप्य तपश्रियांचे तप आणि योगी यांचे हे पंढरीत समचरण आवर उभे आहे.त्याला भेटायला निघालेला हा मेळावा ही एक अलौकिक आणि आनंद विश्व आहे असे उद्गार ज्येष्ठ संत साहित्यिक रामचंद्र देखणे यांनी काढले.
सातारा येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने समर्थ सदन संस्कृतीक ज्ञानपीठ येथे आयोजित केलेल्या चातुर्मासातील कार्यक्रमांतर्गत श्री .देखणे यांची प्रवचन माला संपन्न झाली.यामध्ये त्यांनी वरील उद्गार काढले.
पंढरीची वारी या प्रवचनात बोलताना देखणे पुढे म्हणाले की,हा एक अलौकिक अविष्कार आहे,आणि हे आनंद विश्वआहे त्या विश्वाला प्रकाश देणारा पंढरीचा पांडुरंग हा चीत सूर्य आहे. तर ज्ञानोबा तुकोबा हे ऊर्जा देणारे सूर्य आहेत.या महामेळाव्यात महंत,सिद्ध पुरुष स्थिरावले.आज वारीला 1000 वर्षांची मोठी परंपरा आहे. शंभरहून अधिक मान्यवर संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात.भक्तीचे सामाजिकीकरण काय असते हे या वारीकडे पाहिल्यावर लक्षात येते. संत साहित्यातील अभंग,गवळणी,भारुड यांचा अनुभव या वारीत घेता येतो. चालण्याची शिस्त, गाण्याची शिस्त ही वारीत अनुभवायला मिळते .त्यामुळे लष्करी शिस्तीचा एक आध्यात्मिक आविष्कार म्हणूनच या वारीकडे पाहता येईल .
आपल्या दुस्रया प्रवचनामध्ये रामचंद्र देखणे यांनी मराठी संतांच्या गवळणी व भारुड यावर विवेचन देताना गवळण म्हणली की,संत एकनाथांचे नाव पुढे येते. संत एकनाथांनी हे दोन प्रकट लोकाविष्कार आपल्यापुढे सादर केले.संत साहित्याचे मोठे दालन गवळणी भरले आहे. हे रूपक काव्य आहे.अध्यात्माचा अर्थ शृंगाराच्या माध्यमातून सांगण्यासाठी त्यांनी कृष्णाचे जीवन निवडले आणि भक्तीला श्रृंगार आणि नटवले भावजी वनालाही त्यांनी यामध्ये उभे केले प्रेम भावनेने रतिरूप घेतले की तो शृंगाराचा स्थायीभाव होतो .महाराष्ट्रातील संतांनी अडवलेल्या गोपी कृष्णाचा शृंगार भाव हा भक्ती रसाचा एक पर्याय होतो.भागवतात या गवळणींची उत्पत्ती झाली रूपक असणाया अध्यात्मातील या गवळणी संतांच्या विरहणी आणि लोककलावंतांच्या गवळणी असे समृद्ध झालं हेआपण पाहू शकतो. ऐश्वर्या भक्ती ,वात्सल्य भक्ती यांचे रूपक आपण पाहताना आनंद हा नंद आहे. सद्बुद्धीही यशोदा आहे. ज्ञानवृत्ती या गोपिका असून अनुराग ही मुरली आहे, राधा ही भक्ती आहे आणि कृष्ण हा आत्मा आहे. या सर्वांचे एकत्र झालेला देह हा एक गोकुळच आहे. मराठी संतांच्या पंधराशे होऊन अधिक गवळणी आणि शाहिरांच्या पाचशे ते सहाशे होऊन गवळणी एकत्र केले असता दोन हजाराहून अधिक गवळणींचा मोठा संग्रह आपल्याला अनुभवता येईल.
दरम्यान ज्येष्ठ समर्थ भक्त बाळूबुवा कुलकर्णी रामदासी यांनी समर्थांची ओवी असलेल्या ..दुर्लभ शरीरात दुर्लभ आयुष्य त्याचा करू नये नाश दास म्हणे सावकाश विवेक पहावा ..या ओवी वर आपले प्रवचन सादर करताना सर्व संतांनी देहाची निंदाच केली आहे हे शरीर किती घाणेरडे आहे याचे प्रदर्शन त्यांनी केले .मात्र समर्थ रामदास स्वामींनी देहाची निंदाही केली व प्रशंसाही केली …धन्य धन्य हा नरदेहो..या श्लोकातून प्रशंसाही केली आहे संपूर्ण देह किती चांगला आहे याचे स्वतःहून त्यांनी दासबोधात दिले आहे विवेक चुडामणी ग्रंथाच्या आधारे मनुष्यत्व महापुरुषत्वम दुर्लभ मनुष्यत्व असल्याचे सांगितले आहे. देहाची ती कर्तव्यता काय हे या प्रवचनातून बाळू बुवा रामदासी यांनी मांडण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान तरुण कलाकार होनरज मावळे यांनी आपल्या कीर्तनामध्ये मूळ पद ..घातक मद अवलोकी .. ज्याचे रचनाकार तारकाश्रमस्वामी असून यातून
अहंकार, मद, दंभ, ताठा या गोष्टींमुळे माणसाचा आत्मघात होतो. स्वाभिमान असावा पण अभिमान नको, मी पणा सोडून अनन्य भावाने भगवंतास शरण गेल्यास जीवन सार्थकी लागेल. याचे सुंदर निरुपण केले.आपल्या कीर्तनात आख्यान सादर करताना पार्थरथी हनुमान तीर्थयात्रेसाठी रामेश्वर येथे आलेला अर्जुन अहंकारापोटी प्रभू रामचंद्रांच्या धनुर्विद्येवर आक्षेप घेतो व हनुमंतरायांना बाणांचा सेतू बांधुन दाखवतो. मारुतीराय उडी मारून तो सेतू मोडतात व अर्जुनाचा अहंकार संपवतात, या नंतर मारुतीरायांना अहंकार होतो व प्रभू श्री हरी वृद्धाच्या रुपात येऊन त्यांचा अहंकार संपवतात.अखेर, वृद्धाच्या रुपात आलेल्या श्रीहरीचे रूप मारुतीरायांना श्रीकृष्णाचे दिसते व अर्जुनाला श्रीरामांचे
राम तोचि आहे कृष्ण, कृष्ण तोचि आहे राम ।अहंकार घातक याची जाणीव श्री हरी आपल्या दोन्ही परम् भक्तांना करून देतात. हे अतिशय सुरेख रीतीने सादर केले.
दरम्यान दि.24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान समर्थ भक्त कौस्तुभ बुवा रामदासी यांचे कीर्तन होणार असून 27 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट दरम्यान पुणे येथील प्रवीण बुवा गोखले यांचे प्रवचन होणार आहे.








