दरवषी 10 सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त हा खास लेख…
कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे. उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे…
आनंदी जीवन जगण्यासाठी ताण आणि नैराशाच्या पक्षांनी तुमच्या डोक्मयावर घिरटय़ा घालता घालता डोक्मयावर घरटं करणं टाळा…अशी एक म्हण आहे ती आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. दरवषी 10 सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस’ म्हणून साजरा केला जातो. विस्कटलेला संसार, परीक्षा कठीण गेल्याने आलेले नैराश्य, आर्थिक विवंचनेमुळे भविष्याची चिंता, जगावर अचानक ओढावलेली नैसर्गिक आपत्ती…या आणि अशा अनेक कारणांमुळे आत्महत्या करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.
नैराश्य एक आजार आहे जो अनेकदा बाहेरून दिसत नाही. सिनेमा आणि साहित्यात दिसणारे रडवे उदास चित्र नेहमी असते असे नाही अनेकदा वरकरणी सारे ठीक आहे असे भासते आणि तसे भासवले जाते. कारण मनात विचार येत असतो की कुणीतरी खिल्ली उडवेल, रागवेल, समजून घेणार नाही मनस्थितीचा फायदा घेईल असे वाटत राहते. आपले नेहमीचे हसरे, दणकट, बिनधास्त बाह्यरूप कायम ठेवावे वाटते. तसे नाही राहिले तर लाज वाटून सारे ठीक असल्याचे नाटक केले जाते. अनेकदा आडून किंवा स्पष्ट सांगूनही जवळचे लोक नीट लक्ष देत नाहीत, कधीतरी नकळत किंवा वैतागून नाही तर व्यस्त असल्याने. मग जबरदस्त एकटेपणा जाणवतो. माझे कुणी नाही आणि काही मार्ग नाही… सुटका नाही… उपयोग नाही, सतत अशा विचारांचा मारा होतो आणि मग मानसिक आणि शारीरिक शक्तीचा ऱहास होतो. मेंदूचा सारासार विचारांचा मार्ग बंद होतो आणि मग पुढची पायरी म्हणजे स्वतःला संपवण्याचे प्रयत्न म्हणजेच ’आत्महत्या’.
घोर नैराश्य आणि आत्महत्या यांचा खूप जवळचा संबंध आहे. 40 ते 60 टक्के लोक नैराश्याच्या तीव्र झटक्मयानंतर आत्महत्या करतात. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो(NCRB) च्या अहवालानुसार 2020च्या तुलनेत2021 मध्ये आत्महत्यांच्या घटनांमध्ये 7.2 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. 75 टक्के आत्महत्याग्रस्तांचे वय 45 पेक्षा कमी असते. प्रत्येक आत्महत्या ही एक शोकांतिका आहे. जी कुटुंबे, समुदाय आणि मागे राहिलेल्या लोकांवर दीर्घकाळ परिणाम करते. आत्महत्या ही केवळ उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होत नाही तर जगातील सर्व प्रदेशांमध्ये ही जागतिक घटना आहे. खरंतर 2019 मध्ये जागतिक आत्महत्यांपैकी 77 टक्केपेक्षा जास्त आत्महत्या कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये झाल्या. मुळात आत्महत्या करणे हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नव्हे. कोणत्याही समस्येचे निराकरण नव्हे प्रत्येक व्यक्तीला या संघर्षाच्या आयुष्यात कधी ना कधी नैराश्य येतंच पण आत्महत्या हे त्याचं उत्तर नसतं! मग या आत्महत्या का होतात? तर संयमाचा अभाव, अपरिपक्वता, ‘नाही’ ऐकण्याची नसलेली सवय, आत्मविश्वासाचा अभाव आणि जवळच्या माणसांचा अविश्वास.
आपण हे लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत असतात. परंतु नैराश्याच्या जाळय़ात अडकून आत्महत्येचा निर्णय घेण्यापूर्वी एकदा मानसिक आरोग्य विभागातील तज्ञांकडे येऊन आपले मन मोकळे करून पाहा. जिल्हास्तरावर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मोफत मानसिक आरोग्य सेवा दिल्या जातात. कुणी येईल, हात धरून नेईल अशी वाट पाहू नका मदत घ्या. मनोविश्लेषक किंवा समुपदेशकांची किंवा तुमच्या डॉक्टरांची तरी!!
लक्षात घ्या आपले मन हे एखाद्या हिमनगासारखे असते. आइसबर्ग किंवा हिमनग जेव्हा पाण्यावर दिसतो तेव्हा बर्फ वजनाने पाण्यापेक्षा हलका असल्याकारणाने पाण्यावर तरंगतो आणि हिमनगाचा एक दशांश आपल्याला पाण्यावर दिसतो. म्हणून तर टायटॅनिकसारखी मोठमोठी जहाज हिमनगावर आपटून फुटतात व बुडून जातात. धोक्मयाचा इशारा मिळवूनदेखील आपल्याला वेग कमी करता येत नाही. पुरेसे अंतर ठेवले जात नाही. आपल्या मनाच्या बाबतीतही तसेच होते आपले मन धोक्मयाचा इशारा देत असले तरी आत खोलवर राग, द्वेष, उद्वेग उकळत असतो याचा अंदाज कधी आपल्याला येत नाही. हे मोठय़ांच्या बाबतीत काय किंवा मुलांच्या बाबतीत काय? वरवर शांत बसणारी न बोलणारी माणसं मग अचानक काहीतरी करून बसतात.
आज इथे मी सामान्य खरंतर अतिसामान्य माणसांनी आत्महत्या कशी समजून घ्यायची? याची काही उत्तरे मांडते आहे.
1. या जगाला आणि मनुष्याच्या अस्तित्वाला एकंदरीतच काही अर्थ नाही त्यामुळे आयुष्य स्वतःच्या हाताने संपवणे हा एकच खरा रस्ता.
2. माझ्या जगण्याने इतरांना आणि विशेषतः जवळच्या माणसांना त्रास आहे. हा त्रास संपविण्यासाठी माझा मृत्यू गरजेचा आहे. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे पण मी मेल्याशिवाय त्यांची सुटका नाही.
3. खूप प्रयत्न झाले. आता थकलो/हरलो/ संपलो. मी जातो आता. तुम्ही सुखी रहा.
4. माझा प्रचंड संताप झाला आहे. मी हा टोकाचा राग स्वतः वर काढणार. खून की आत्महत्या हाच माझ्यापुढे पर्याय आहे. मी निवडली आत्महत्या. तुम्हाला आता जन्मभराची टोचणी राहील आणि तीच तुमची शिक्षा.
5. माझे आयुष्य मला सन्मानाने जगायचे आहे. कोणत्याही कारणाने मानहानी किंवा परावलंबित्व नको. ते आल्यास मी सन्मानाने माझे आयुष्य स्वतः संपवून टाकीन.
6. टोकाची निराशा आणि त्यामुळे विचारबुद्धी कुंठित होणे. त्यातून आत्महत्या.
7. कमालीची वेदना, दुर्धर आजार.
पण या सगळय़ाचा शेवटचा रस्ता म्हणजे- टोकाचा एकटेपणा आणि या एका रस्त्याशिवाय काहीच उरले नाही याची पूर्ण खात्री. कधी रागात क्षणार्धात पटलेली. कधी विचारपूर्वक खूप वेळाने पटलेली. अशा वेळेस सोबतीची गरज असते. खांद्यावर हात ठेवून जवळ धरून ठेवणारी व्यक्ती लागते. हाताला धरून या वादळातून पलीकडे नेणारी साथ लागते. अनेकदा त्या मदत करणाऱया व्यक्तीला माहितीसुद्धा नसते की आपल्या शेजारी बसण्याने, एक चहाचा कप दिल्याने, एक स्मित हास्य दिल्याने, एक धन्यवाद म्हटल्याने आपण कोणाचातरी जीव वाचवला.
बरेचदा तो एक क्षण टळला तर जीव वाचतो.
माणसाने माणसासारखे वागणे, एकमेकांना धरून राहणे, जवळच्या माणसाला समजावून घेऊन ‘मीच बरोबर आहे’ पेक्षा ‘मी तुझ्या बरोबरच आहे’ हे कृतीतून दाखवणे महत्त्वाचे आहे.
-रेश्मा खेमराज भाईप








