प्रतिनिधी / बेळगाव
सार्वजनिक वाचनालय आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेत शुक्रवार दि. 20 रोजी सायंकाळी 5.30 वाजता मराठा मंदिराच्या सभागृहात गोवा येथील कृष्णाजी कुलकर्णी हे ‘संत शिकवण आणि आजचा समाज’ या विषयावर शेवटचे पुष्प गुंफणार आहेत. त्यांचा परिचय पुढीलप्रमाणे…
गोवा येथील कृष्णाजी शामराव कुलकर्णी हे संत साहित्याचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत. गोवा येथे 30 वर्षे मराठी विषयाचे अध्यापन केले आहे. ‘आस्वादाच्या पाऊलवाटा’ हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. बा. द. सातोस्कर यांच्या अनुवादित साहित्यावर गोवा सरकारपुरस्कृत ‘गोमंतकीय मराठी वाङ्मयाचा इतिहास’मध्ये व ‘बोरकर काव्य समीक्षा’ या संपादित ग्रंथात लेखन केलेले आहे. विविध साहित्य संमेलने, परिसंवाद, चर्चासत्रे, कृतिसत्रे या उपक्रमांतून सहभाग घेतला आहे. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतील विविध शहरांमधून व्याख्याने दिली आहेत. मराठी साहित्य, संत वाङ्मय आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास हे जिव्हाळ्याचे विषय त्यांनी हाताळले आहेत.









