प्रतिनिधी / बेळगाव
लोककल्प फाऊंडेशन आणि केएलई आयुर्वेद हॉस्पिटल यांच्यावतीने 9 जानेवारी रोजी जांबोटीमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी आणि आरोग्य जनजागृती करण्यात आली.
केएलई आयुर्वेद ऊग्णालयाचे डॉ. हेमलता, डॉ. राजन, डॉ. शामा, डॉ. निकिता, डॉ. ऐश्वर्या एम., डॉ. स्वप्नाली, डॉ. प्रियांका के., श्रीधर के., नारायण उपस्थित होते. लोककल्प फौंडेशनचे कर्मचारी व स्वयंसेवक संतोष कदम, सूरजसिंग राजपूत, अनंत गावडे, प्रितेश पोटेकर व सुहासिनी पेडणेकर यांनी परिश्रम घेतले.
शिबिरावेळी 150 ग्रामस्थांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. लोकमान्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी सुरू केलेल्या गाव दत्तक योजनेंतर्गत हा उपक्रम सुरू आहे. या योजनेंतर्गत 32 दत्तक गावांमध्ये अनेक आरोग्य शिबिरे, शैक्षणिक चर्चासत्रे आयोजित केली जातात.









