बेळगाव : बेंगळूर येथे 39 व्या राज्यस्तरीय आर्टिस्टिक रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या आर्मी प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी खुशी एकनाथ अगसीमनी हिने 3 रौप्यपदके पटकावून यश संपादन केल्याबद्दल एमएलआयआरसीच्या आर्मी शाळेतर्फे खास गौरव करण्यात आला. बेंगळूर येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंगमध्ये (सोलो फ्रीस्टाईल) खुशी अगसीमनीने 3 रौप्यपदके पटकाविली आहेत. तिच्या या कामगिरीमुळे एसजीएफआय राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. खुशीने या स्पर्धेत मिळविलेल्या कामगिरीची दखल घेऊन आर्मी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका दर्शना ओसवाल व शिक्षक वर्गाने तिचा खास गौरव केला. तिला क्रीडा शिक्षक लक्ष्मी बडमंजी, रेखा जांगळे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन तर दर्शना ओसवाल यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Previous Articleनिपाणीकडे भुतरामट्टी चषक
Next Article फास्ट फॉरवर्ड, आयबीसीटी, साईराज उपांत्यपूर्व फेरीत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









