के. आर. शेट्टी चषक फुटबॉल स्पर्धा : फाँको, कॉसमॅक्स, मजर, निपाणी, बुफा संघांची पुढील फेरीत आगेकूच
बेळगाव : रत्नाकर के. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित निमंत्रितांच्या राहुल के. आर. शेट्टी चषक फुटबॉल स्पर्धेत गुरूवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात फास्ट फॉरवर्डने मझर युनायटेडचा 2-0 असा पराभव करून तर स्वस्तिकने निपाणी युनायटेडला शून्य बरोबरीत रोखले. फाँको, आयबीसीटी, साईराज, फास्ट फॉरवर्ड, कॉसमॅक्स, मजर युनायटेड, निपाणी युनायटेड, बुफा संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. आजच्या सामन्यातून हर्षल पाटील व पार्थ अष्टेकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. लव्हडेल स्कूलच्या स्पोटींग प्लॅनेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या शेवटच्या साखळी सामन्यातील पहिल्या सामन्यात फास्ट फॉरवर्ड संघाने मजय युनायटेडचा 2-0 असा पराभव करून या सामन्यात पहिल्या सत्रात 11 व्या मिनिटाला मजर युनायटेडच्या उमरने गोल करण्याची नामी संधी दवडली. 23 व्या मिनिटाला फास्ट फॉरवर्डच्या इदायतच्या पासवर नदीम बेपारीने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 35 व्या मिनिटाला मजर युनायटेडच्या अब्बुजर बिस्तीने मारलेला वेगवान फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. 45 व्या मिनिटाला फास्ट फॉरवर्डच्या शाबाजने मारलेला फटका मजर युनायटेडच्या गोलरक्षकाने उत्कृष्ट अडविला. 61 व्या मिनिटाला फास्ट फॉरवर्डच्या इदायतच्या पासवर शाबासने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. 68 व्या मिनिटाला मजर युनायटेडच्या अल्तमशने गोल करण्याची संधी दवडली.
दुसऱ्या सामन्यात निपाणी संघाला स्वस्तीक संघाने शन्यू बरोबरीत रोखले. या सामन्यात 16 व्या मिनिटाला निपाणीच्या करण मानेने मारलेला फटका स्वस्तीकच्या गोलरक्षकानी आपल्या डावीकडे झोकत उत्कृष्ट अडविला. 20 व्या मिनिटाला स्वस्तीकच्या श्रीकांतने मारलेला फटका गोल पोस्टला लागून बाहेर गेला. त्यामुळे पहिल्या सत्रात गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 47 व्या मिनिटाला गुरू कलकेरने मारलेला फटका गोल पोस्टला लागून बाहेर गेला. 60 व्या मिनिटाला निपाणीच्या प्रशांत आजरेकरने गोल करण्याची नामी संधी दवडली. निर्धार वेळेत दोन्ही संघानी गोल करण्यात अपयश आल्याने हा सामना शन्यू बरोबरीत राखला. साखळी पध्दतीचे सामने समाप्त झाल्याने उपांत्यपूर्व फेरीत फॅन्को, साईराज, कॉसमॅक्स, मजर युनायटेड, बुफा, निपाणी, फास्ट फॉरवर्ड, आयबीसीटी संघानी प्रवेश मिळविला आहे. शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळविण्यात येणार आहे. सामन्यानंतर प्रमुख पाहूणे प्रतिक शहा, कडोली ग्रा. पं. सदस्य सुनील पावनोजी, ज्येष्ठ फुटबॉलपटू जोसेफ परेरा, सुनील देसाई, प्रणय शेट्टी यांच्याहस्ते सामनावीर खेळाडू हर्षल पाटील, पार्थ अष्टेकर, तर इन्फॉक्ट खेळाडू उमर व श्रीकांत यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
उपांत्यपूर्व फेरीचे सामने 1)फॅन्को वि. साईरा यांच्यात दुपारी 12 वा., 2)कॉसमॅक्स वि. मजर युनायटेड दु. 1.30 वाजता, 3)बुफा वि. निपाणी दु. 3 वाजता 4) फॉस्ट फारवर्ल्ड वि. आयबीसीटी दु. 4.30 वाजता खेळविण्यात येणार आहे.









