पंजाबच्या उदय सहारनकडे नेतृत्व : महाराष्ट्राच्या दोघांना स्थान
वृत्तसंस्था/ मुंबई
बीसीसीआयच्या कनिष्ठ निवड समितीने आगामी अंडर 19 आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. पंजाबचा उदय सहारनकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या युवा संघात महाराष्ट्राचा अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी व सचिन धस यांना संधी मिळाली आहे. या स्पर्धेला युएई येथे 8 डिसेंबरपासून सुरुवात होणार असून रविवारी 17 डिसेंबर रोजी अंतिम सामना होईल.
पंजाबचा उदय सहारन कॅप्टन
पंजाबच्या उदय सहारनकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले असून तर, मध्य प्रदेशचा सौम्य पांडे उपकर्णधार असणार आहे. निवड समितीने देशभरातील प्रतिभावंतांची निवड केली असून यामध्ये महाराष्ट्राचे दोन तर हैदराबादचे दोन तर मुंबईचा एक खेळाडू आहे. तसेच या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, यूएई, जपान, श्रीलंका आणि बांगलादेश हे आठ देश सहभागी होणार आहेत. दरम्यान, प्रत्येकी चार संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत तीन सामने खेळणार आहे. यानंतर 15 रोजी डिसेंबर रोजी उपांत्य सामने होतील यानंतर 17 रोजी दुबई येथे अंतिम सामना खेळवला जाईल, असे आशियाई क्रिकेट परिषदेने सांगितले आहे.
दरम्यान, भारतीय संघ अंडर 19 आशिया कपचा गतविजेता आहे. युवा भारतीय संघाने सर्वाधिक 8 ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत. यामुळे यंदाही जेतेपदाचा दावेदार असलेला भारतीय संघ यंदाच्या स्पर्धेत कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अंडर 19 आशिया चषकासाठी भारतीय संघ – अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, उदय सहारन (कर्णधार), ए. अवनिश राव, सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.
राखीव – प्रेम देवकर, अंश गोसाई व मोहम्मद अमान.
भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक –
8 डिसेंबर – भारत वि. अफगाणिस्तान
10 डिसेंबर – भारत वि. पाकिस्तान
12 डिसेंबर – भारत वि. नेपाळ
15 डिसेंबर – दोन्ही उपांत्य फेरीचे सामने
17 डिसेंबर – अंतिम सामना









