धुलिवंदनच्या पार्श्वभूमीवर मांसाहाराला पसंती
बेळगाव ; धुलिवंदनादिवशी बहुतांश नागरिक मांसाहाराचा बेत आखतात. त्यामुळे मंगळवारी शहर परिसरात मटण-चिकनला मागणी वाढली होती. त्यामुळे विव्रेत्यांकडेदेखील खरेदी वाढली होती. धुलिवंदनादिवशी मंगळवार असल्याने खवय्यांनी मांसाहाराला पसंती दिली. मात्र चिकनच्या दरात काहीसी वाढ झालेली दिसून आली. शहरात मटण 680 ऊपये तर चिकन 180 ऊपये किलो दराने विक्री सुरू आहे. मात्र धुलिवंदनादिवशी चिकनचा दर प्रतिकिलो 10 ऊपयांनी वाढलेला दिसून आला. त्यामुळे चिकन खरेदी करणाऱ्या नागरिकांना 10 ऊपये जादा मोजावे लागले. रंगपंचमीनिमित्त मांसाहाराचा बेत आखला जातो. शिवाय तऊणाई पार्ट्यांना पसंती देते. विशेषत: ओल्या पार्ट्या अधिक प्रमाणात केल्या जातात. त्यामुळे मंगळवारी शहरात मांसाहाराची विक्री वाढली होती. लम्पीच्या रोगामुळे मध्यंतरी काहीकाळ बकरी बाजार बंद झाले होते. त्यामुळे मटण दरातदेखील वाढ झाली. त्यामुळे काही खवय्ये मटण खरेदीकडे पाठ फिरवित असल्याचे विव्रेते सांगत आहेत. मात्र मटणाच्या तुलनेत चिकनचे भाव कमी असल्याने चिकनला पसंती देऊ लागले आहेत









