वृत्तसंस्था/ शांघाय
एटीपी टूरवरील रविवारी येथे शांघाय मास्टर्स 1000 दर्जाच्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पोलंडच्या हुबर्ट हुरकेझने रशियाच्या आंद्रे रुबलेव्हचा पराभव करत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात 26 वर्षीय हुरकेझने रुबलेव्हचा 6-3, 3-6, 7-6 (8-6) असा पराभव केला. या सामन्यात हुरकेझने 21 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. हुरकेझचे हे एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेतील दुसरे विजेतेपद आहे. हुरकेझने आतापर्यंत एटीपी टूरवरील स्पर्धेत सात अजिंक्यपदे पटकाविली आहेत.









