प्रतिनिधी /बेळगाव
भारत विकास परिषदेच्यावतीने 60 वा स्थापना दिवस, दहावी व बारावीच्या प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच ‘डॉक्टर्स डे’ निमित्त डॉक्मटरांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम रविवारी झाला. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एस. एन. शिगली व डॉ. सविता कद्दु उपस्थित होत्या.
विनायक मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् सादर केले. स्वरा मोरे हिने सुश्राव्य सरस्वती वंदना प्रस्तुत केली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष विनायक घोडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. जे. जी. नाईक यांनी भारत विकास परिषदेच्या सेवा व संस्कार उपक्रमांची माहिती दिली. व्ही. आर. गुडी यांनी शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. हेमंत देशपांडे यांनी नवीन सदस्यांना शपथ देवविली. डॉ. व्ही. बी. यलबुर्गी यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला.
वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. एस. एन. शिगली व डॉ. सविता कद्दु यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावीमध्ये शहरात प्रथम आलेल्या वेंकटेश डोंगरे व अमोघ कौशिक तसेच बारावी विज्ञान शाखेत प्रणीत कल्याणशेट्टी, वाणिज्य शाखेत रोचन शिंदे व कला शाखेत महेश बामणे यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन खास गौरविण्यात आले. सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केले.
प्रा. अरुणा नाईक यांनी सूत्रसंचालन केले. सेपेटरी एम. जी. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. व्ही. एन. जोशी, रामचंद्र तिगडी, एन. बी. देशपांडे, सुहास गुर्जर, सुखद देशपांडे, स्वाती घोडेकर, उमा यलबुर्गी आदी उपस्थित होत्या. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.









