प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा हायस्कूलच्या 1987-88 सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच झाला. 34 वर्षांनंतर एकत्र आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर आनंद होता. या बॅचने रंग लावून शाळेच्या सुधारणेत लक्ष घातल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
भाग्यश्री चोपडे यांनी प्रास्ताविक केले. नागेश मंडोळकर यांच्या अध्यक्षतेखाली फोटो पूजन करण्यात आले. दिवंगत शिक्षक व वर्गमित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राजीव गोडसे या विद्यार्थ्याने सर्वांना भगवत्गीतेची एक प्रत दिली. यावेळी त्यावेळचे मुख्याध्यापक मालोजी अष्टेकर, खन्नूरकर, पिसाळे, जाधव, नाईक, एस. के. पाटील, आर. के. पाटील, एस. टी. पाटील, जी. व्ही. पाटील, अनगोळकर, सध्याचे मुख्याध्यापक रविंद्र तरळे, शिंदे, पाटील, मीराताई पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
बॅचमधील विद्यार्थी भारतीय सैन्यात कार्यरत असणारे कृष्णा किल्लेकर, जोतिबा भोसले, महादेव हिरोजी यांचा शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्या येळ्ळूरकर, सरोजा पाटील, विकास देसाई, विनोद नाईक, गणपत शहापूरकर, रेणुका कोलते, रेणुका चौगुले, संजय गावडे, चंदा बेळगुंदकर, शीला गडकरी या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मोठय़ा संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.









