1 लाख 27 हजार रुपये किंमत : तीन व्हेरियंटमध्ये सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिरो मोटोकॉर्पची एक्सट्रीम 160 आर 4 व्ही ही बाईक नुकतीच भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे. यामध्ये दमदार सुविधांची भर असणार असून किंमत 1 लाख 27 हजार रुपयांच्या घरात असणार असल्याची माहिती आहे.

सदरची गाडी तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली असून तिनही गाड्यांची किमत ही वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. स्टँडर्ड व्हेरियंटची किमत 1 लाख 27 हजार रुपये, कनेक्टेड 2.0 व्हेरियंटची किंमत 1 लाख 32 हजार 800 रुपये आणि प्रो व्हेरियंटची किंमत 1 लाख 36 हजार 500 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
कोणती आहेत वैशिष्ट्यो
या गाडीत 163 सीसीचे सिंगल सिलेंडरचे इंजिन एअर कुल्ड व चार व्हॉल्व ऑइल कुल्डसह असणार आहे. गाडीवर बसल्यानंतर कमी झटके बसावेत यासाठी या गाडीत 7 स्टेप अॅडजस्टेबल शोवा मोनोशॉकची रचना केलेली आहे. सीटची उंची 795 एमएम इतकी असून गाडीचे वजन 144 किलो इतके आहे.
सदरची गाडी बाजारात टीव्हीएस अपाची आरटीआर 160 आणि बजाज पल्सर एन 160 आर यांना टक्कर देणार असल्याचे सांगितले जाते.









