विशाखापट्टणम
आंध्रप्रदेशचे माजी मुख्यंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी नायडू यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 21 सप्टेंबरपर्यंत स्थगित केली आहे. कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी 9 सप्टेंबर रोजी सीआयडीने नायडू यांना अटक केली होती. हा घोटाळा 371 कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात आले होते.









