सोलाना, टोनकॉईन 5 टक्क्यांपर्यंत वाढले : बिटकॉईनसह अन्य आभासी चलनांमध्ये तेजीचा कल
नवी दिल्ली :
अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या उद्या (आज) होणाऱ्या धोरणात्मक बैठकीपूर्वी मंगळवारी प्रमुख क्रिप्टो टोकनच्या किमतीत वाढ झाली. बिटकॉईनची किमत 0.92 टक्क्यांच्या उडीसह 26,864 डॉलर्सच्या पातळीवर पोहोचली. त्याच वेळी, इथरियम 1,600 डॉलरच्या वर व्यापार करत होता. दरम्यान, जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप 1.07 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढली आहे. गेल्या 24 तासांत जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅपमध्ये 0.76 टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्रिप्टो मार्केटसाठी आजचा दिवस सकारात्मक आहे
कॉइनस्विच मार्केट्स डेस्कचे वरिष्ठ व्यवस्थापक शुभम हुडा यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांत क्रिप्टो मार्केटमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. बिटकॉईनसाठी हा आणखी एक सकारात्मक दिवस आहे कारण तो किंचित कमी होण्याआधी 27,400 डॉलरच्या पातळीवर पोहोचला. ते म्हणाले की क्रिप्टो मार्केटच्या दृष्टीने गेले 8 दिवस बरेच सकारात्मक आहेत.
कोणत्या कारणांमुळे मिळली तेजी
दरम्यान, मुद्रेक्सचे सीईओ आणि सह-संस्थापक एडुल पटेल म्हणाले की बिटकॉइनने ट्रेडिंगच्या शेवटच्या 24 तासांमध्ये 27,000 डॉलरचा स्तर ओलांडला आहे. 31 ऑगस्टनंतरची ही सर्वोच्च पातळी आहे. आगामी यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी क्रिप्टो मार्केटमध्ये तेजी दिसून येत आहे. कारण फेडरल ओपन मार्केट कमिटी पुढील काही काळ दर वाढ रोखू शकेल अशी आशा व्याप्रायांना आहे.
मंगळवारी इतर क्रिप्टो टोकन देखील तेजीत एक्सआरपी, कारडोन, टोनकॉईन ण् सोलाना आणि लिटेकॉईन 2-4 टक्क्यांनी वाढले बाययुकॉईनचे सीईओ शिवम ठकराल यांनी दरम्यान सांगितले की, तेलाच्या वाढत्या किमती आणि अनिश्चित मॅक्रो इकॉनॉमिक घटकांमुळे आगामी काळात बाजाराची गती कमी होऊ शकणार असल्याचेही संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.









