वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बोस्टनमध्ये नुकत्याच झालेल्या डेव्हीड हेमरी व्हॅलेन्टाईन निमंत्रीतांच्या स्पर्धेत भारताचा धावपटू गुलवीर सिंगने पुरुषांच्या 3 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत नवा इनडोअर राष्ट्रीय विक्रम नोंदविला. भारतीय सेनेतील 26 वर्षीय गुलवीरसिंगने 7 मिनीटे 38.26 सेकंदांचा अवधी घेत यापूर्वी म्हणजेच 2008 साली सुरेंद्र सिंगने नोंदविलेला 7 मिनीटे 49.47 सेकंदांचा राष्ट्रीय इनडोअर विक्रम मागे टाकला. गुलवीर सिंगने हांगझोयु आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक मिळविले होते.









