वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा धावपटू तसेच आशियाई इनडोअर स्पर्धेत 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत स्पर्धा विक्रम करणारा गुलवीर सिंगने चालु वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आपली पात्र सिद्ध केली. अमेरिकेतील बोस्टन येथे झालेल्या इनडोअर स्पर्धेत गुलवीरने 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत 12 मिनिटे, 59.77 सेकंदांचा अवधी घेत चौथे स्थान मिळविले.
विश्वचषक अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी या क्रीडा प्रकारात पात्रतेची मर्यादा 13 सेकांदापेक्षा कमी होती. गुलवीरने ही मर्यादा गाठत विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे तिकीट आरक्षित केले आहे. गुलवीर सिंग हा भारतीय सेनादलाचा सदस्य आहे.









