प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा जागृती निर्माण संघातर्फे रविवार दि. 8 रोजी विद्यार्थ्यांना गणित विषयाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात सकाळी 10.30 वाजता प्रा. डॉ. मंदाकिनी मुचंडी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी बीई, डिप्लोमा, पीयुसी, बीएस्सीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयाबाबत मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.
धारवाड येथून एमएस्सी (गणित) मध्ये त्या विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झाल्या आहेत. शिवाय राणी चन्नम्मा विद्यापीठातून गणित विषयात पीएचडी केली आहे. त्याबरोबरच जीएसएस कॉलेज, एस. जी. बाळेकुंद्री इंजिनिअरिंग, केएलई इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सेवा बजाविली आहे. सध्या केएलएस गोगटे इंजिनिअरिंगमध्ये कॉलेजमध्ये साहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.









