रशियाचे सैनिक युक्रेनच्या शहरांवर क्षेपणास्त्रांच मारा करत आहेत. अलिकडेच रशियाने आण्विक क्षेपणास्त्रs डागण्याचा सराव केला होता. यामुळे युक्रेनवर आण्विक हल्ल्याचा धोका वाढला. याचदरम्यान रशियाने आमचे सैन्य युक्रेनवर अण्वस्त्रांनी हल्ला करणार नसल्याचे म्हटले आहे.
रशिया युद्धादरम्यान युक्रेनमध्ये टॅक्टिकल न्युक्लियर वेपनचा वापर करणार नसल्याचे विधान रशियाच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते एलेक्सी जैतसेव्ह यांनी केले आहे. तर युरोपीय महासंघ रशियाच्या कच्च्या तेलावर बंदी घालण्याच्या तयारीत असताना हंगेरीला याचे समर्थन नसणार आहे. हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओरबान यांनी निर्बंधांचा अर्थ आमच्या अर्थव्यवस्थेवर अणुबॉम्ब पाडविणे असल्याचे ओरबान यांनी म्हटले आहे.
झेलेंस्की सद्यकाळातील चर्चिल
अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्याशी व्हर्च्युअली संवाद साधला आहे. याचबरोबर बुश यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये झेलेंस्की यांचे कौतुक करत त्यांना सद्यकाळातील विन्स्टन चर्चिल संबोधिले आहे. झेलेंस्की यांचे नेतृत्व आणि स्वातंत्र्यासाठीची प्रतिबद्धता प्रशंसनीय असल्याचे बुश म्हणाले.
युद्धात 220 मुलांचा मृत्यू
युद्धाच्या प्रारंभापासून आतापर्यंत 223 मुलांचा मृत्यू झाला असून 400 हून अधिक मुले जखमी झाली आहेत. सर्वाधिक 139 मुलांचा मृत्यू डोनेट्स्क क्षेत्रात झाला आहे. कीव्हमध्ये 116, खारकीव्हमध्ये 95 आणि खेरसॉनमध्ये 46 मुलांनी जीव गमावला आहे. तर युक्रेनमधील 6.731 नागरिकांचा युद्धात मृत्यू ओढवला आहे.









