बेळगाव : हैदराबाद येथील इंडस नेपाळ रुद्राक्ष संस्थेच्यावतीने टिळकवाडी, महालसा ज्वेलर्स बिल्डिंग, कला मंदिर मॉलसमोर, शुक्रवार पेठ, पहिल्या रेल्वे गेटजवळ रुद्राक्षांचे प्रदर्शन रविवार दि. 10 ते 18 ऑगस्टपर्यंत सकाळी 10.30 ते रात्री 8.30 या वेळेत सुरू आहे. प्रदर्शनात विविध प्रकारच्या रुद्राक्षांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित केली आहे. रुद्राक्ष धारण करणे शुभदायक मानले जाते.
रुद्राक्षसंबंधी माहिती देताना इंडस नेपाळ रुद्राक्ष संस्थेचे संचालक मंजू गंडी यांनी सांगितले की, एकमुखी रुद्राक्षपासून 21 मुखी रुद्राक्षपर्यंत प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एखाद्याच्या जन्म दिनांकावर आधारित रुद्राक्ष हवे असेल तर त्यासाठी वेदगणित शास्त्रानुसार रुद्राक्ष देण्यात येईल. त्यासाठी पंचांग अथवा कॉम्प्युटरची आवश्यकता नाही. प्रदर्शनामध्ये विक्री झालेले रुद्राक्ष नकली असल्याचे सिद्ध झाल्यास विकत घेतलेल्या रकमेच्या दोनपट रक्कम आम्ही देतो.
सिद्धमाळा, जपमाळा, स्फटिकमाळा, तुळशीमाळा, शाळीग्राम, शिवमाळा, ज्ञानमाळा अशा विविध प्रकारच्या रुद्राक्ष माळा प्रदर्शनात ग्राहकांना पाहायला मिळतील. शिवपुराणानुसार रुद्राक्ष माळा घातल्याने जीवनात सुख-समृद्धी, भरभराट होते. त्या अनुषंगाने ग्राहकांनी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. अधिक माहितीसाठी 7097396666 यावर संपर्क साधावा.









