बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे आयोजित ‘लोकमान्य लाइफसेव्हर्स ासीपीआर व फर्स्टएड प्रशिक्षण मोहीम 2025’ हा उपक्रम शुक्रवार दि. 8 ऑगस्ट रोजी यशस्वीपणे पार पडला. जीवन वाचविणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणाचा लाभ 150 हून अधिक सहभागांनी घेतला. या उपक्रमासाठी अरिहंत हॉस्पिटल, बेळगाव येथील तज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय टीमने मोलाचे सहकार्य दिले. कार्यक्रमात डॉ. अंबरीश नेर्लीकर (मुख्य वैद्यकीय सेवा अधिकारी व चीफ इंटेंसिव्हिस्ट), महालिंग इस्लामपुरे (प्रभारी, आपत्कालीन विभाग) आणि हयात सकली (नर्सिंग अधीक्षक/आय.सी.एन.) यांनी आपत्कालीन उपचार व सीपीआर पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांनी प्रत्यक्ष प्रशिक्षणातून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत करण्याचे कौशल्य आत्मसात केले. आयोजकांनी सर्व उपस्थित डॉक्टर व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
Previous Articleश्रावणमासनिमित्त बेळगावात भव्य रुद्राक्ष प्रदर्शन-विक्री
Next Article शहर परिसरात अंगारकी भक्तिभावाने
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









