प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावची ग्रामदैवत मरगाई देवीच्या चांदीच्या प्रभावळीची भव्य मिरवणूक रविवारी काढण्यात आली. दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरापासून भांदूर गल्ली येथील मरगाई मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. भंडाऱ्याची उधळण करत प्रभावळीची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.
कपिलेश्वर मंदिराचे ट्रस्टी राहुल कुरणे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी मंदिर बांधकाम कमिटीचे महादेव चौगुले, अनिल मुतकेकर, अजित यादव, विजय घाटगे, सेक्रेटरी विजय चौगुले, सकल मराठाचे प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, बाद्रे पुजारी कुटुंबाच्या उपस्थितीत मिरवणूक पार पडली. यावेळी भक्त मंडळ, जोगते तसेच महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
घोडे तसेच विद्युत रोषणाई केलेल्या रथामध्ये चांदीची प्रभावळ ठेवण्यात आली होती. मिरवणूक कपिलेश्वर उ•ाणपूलमार्गे स्टेशन रोड, ताशिलदार गल्ली, भांदूर गल्ली येथून मरगाई मंदिरापर्यंत काढण्यात आली. महाप्रसाद व महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.









