नवी दिल्ली :
इंडसइंड बँकेने विराल दमानिया यांची चिफ फायनॅन्शीयल ऑफिसर अर्थात सीएफओपदी नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले आहे. सोमवारपासून ते आपल्या पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. संतोष कुमार हे स्पेशल ऑफिसर म्हणून कार्यरत असतील. कुमार हे यासोबत उपसीएफओ म्हणूनही बँकेत कार्यरत असतील. दमानिया हे चार्टडं अकौंटंट असून बँकिंग क्षेत्रातला त्यांच्याकडे 27 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. अलीकडेच बँक ऑफ अमेरिका इंडियाच्या सीएफओपदी कार्यरत होते.









