बेळगाव : उचगाव ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत मथुरा बाळकृष्ण तेरसे व बाळकृष्ण खाचू तेरसे या दांपत्यांची बिनविरोध निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रा. पं. सदस्यांनी तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संस्थापक बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. 21 ग्रा. पं. सदस्य असलेल्या ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून राहिले होते. दोन गट निर्माण झाल्याने निवडणूक चुरशीची होणार अशी शक्यता होती. दरम्यान एका गटातील 13 सदस्य हजर राहिले होते, तर आठ सदस्य गैरहजर होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी ग्रा. पं. सदस्य गजानन नाईक, दत्ता बेनके, उमेश बुवा, सुरज सुतार, आमरीन बंकापुरी, माधुरी पाटील, अनुसया कोलकार, रुपाली गिरी, भारती जाधव, योगिता देसाई, लक्ष्मी कुऱ्हाडे यांच्यासह माजी सदस्य भास्कर कदम, सुनील देसाई, संतोष पाटील, राजेंद्र देसाई आदी उपस्थित होते.
Previous Articleलोककल्प फौंडेशनतर्फे गोल्याळी शाळेला क्रीडा साहित्य वितरण
Next Article संगीताचा मनावर सकारात्मक परिणाम
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









