प्रतिनिधी/ मडगाव
श्री रामनाथ दामोदर संस्?थान जांबावली येथे आज रविवार 27 नोव्हेंबर ते शुक्रवार 2 डिसेंबर 2022 या कालावधीत शिखरकलश प्रतिष्?ठापना सुवर्णमहोत्सव विविध धार्मिक व सांस्?कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे अशी माहिती श्री रामनाथ दामोदर संस्?थानचे अध्यक्ष मंजुनाथ पै दुकळे यांनी दिली.
मडगाव येथे काल संस्थान समिती सदस्य गणाधीश कुंदे (खजिनदार), साईश हेगडे (मुखत्यार), गजानन कुंदे (कार्यवाह सचिव) यांच्या उपस्थितीत अध्यक्ष मंजुनाथ पै दुकळे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना सहा दिवस चालणाऱया महोत्सवाचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला.
श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश परमपूज्य श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज शुक्रवार 2 डिसेंबर 2022 रोजी अनु÷ानाच्या महापुर्णाहूतीला उपस्थित राहणार असल्याचे मंजुनाथ पै दुकळे यांनी सांगितले. सहा दिवसीय महोत्सवात वास्तुशांती, नवग्रह शांती, पुरुष सुक्त हवन, महारुद्र, महाविष्णु, शतचंडी, महाआरती, अन्न संतर्पण आणि इतर धार्मिक विधी संस्थानात आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी उत्सव, रथोत्सव, आरती व प्रसादाचे आयोजन केले जाणार असल्याचे मंजुनाथ पै दुकळे यांनी सांगितले.
श्री रामनाथ दामोदर संस्थानचे सर्व महाजन, कुळावी आणि देव दामबाबाच्या भक्तांनी उत्सवात सहभागी होऊन देव कृपेस पात्र व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शिखरकलश प्रतिष्?ठापना सुवर्णमहोत्सवातील कार्यक्रम
मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी, शके 1944, रविवार दि. 27 रोजी सकाळी ः श्रीदेवता प्रार्थना, श्रीगणेश पूजा, पुण्याहवचन, देव नांदी, आचार्य वरण, श्रीदेवता स्थापना. दुपारी ः महाआरती, अन्नसंतर्पण. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी, शके 1944, सोमवार दि. 28 रोजी सकाळी ः विविध धार्मिक विधी, दुपारी ः महाआरती, अन्नसंतर्पण. सायंकाळी 6.30 वा. ‘हे सुरानो चंद्र व्हा’ संगीत रजनी, गायक ः नरसिंह साने, सिद्धी शेलार मळीक व मनोज देसाई, सूत्रसंचालन ः वंदना बाकरे. रात्रौ 9.00 वा. ‘पालखी उत्सव’ आरती आणि प्रसाद.
मार्गशीर्ष शुद्ध ष÷ाr, शके 1944, मंगळवार दि. 29 रोजी सकाळी ः विविध धार्मिक विधी, दुपारी ः महाआरती, अन्नसंतर्पण. सांयकाळी 6.30 वा. ‘स्वर धुंध’ संगीत मैफल
गायक ः प्रसन्न प्रभू तेंडुलकर, नेहा कळसुलकर आजगावकर, समृद्ध चोडणकर. सूत्रसंचालन ः मानसी वाळवे. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, शके 1944, बुधवार दि. 30 सकाळी ः विविध धार्मिक विधी, तद्नंतर 10 वाजता ‘सहस्त्र कलशाभिषेक’, दुपारी ः महाआरती, अन्नसंतर्पण, सायंकाळी 6.30 वाजता. ‘जीवन संगीत’ संगीत मैफल. गायक ः प्राजक्ता रानडे आणि हृषिकेश रानडे. सूत्रसंचालन ः सिद्धी उपाध्ये रात्री 9.00 वा. ‘विजय रथोत्सव’, आरती आणि प्रसाद.
मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी, शके 1944, गुरुवार दि. 01 डिसेंबर रोजी सकाळी ः विविध धार्मिक विधी, दुपारी ः महाआरती, अन्नसंतर्पण. सायंकाळी 6.30 वा. ‘सूर सांज’ संगीत रजनी, गायक ः अर्चना गोरे आणि मंदार आपटे. सूत्रसंचालन ः गोविंद भगत. रात्री 9.00 वा. द्वादश स्तोत्र अर्चना, ‘पालखी उत्सव’, आरती आणि प्रसाद. मार्गशीर्ष शुद्ध दशमी, शके 1944, शुक्रवार दि. 02 रोजी सकाळी ः विविध धार्मिक विधी, दुपारी ः श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराजांचे आगमन, स्वागत, देव दर्शन, यज्ञमंडपात पालखीतून देव दामोदराचे आगमन ; महापुर्णाहुती, महाआरती, अन्नसंतर्पण. दुपारी ः 3.30 वा. श्रीसंस्थानातर्फे स्वामी महाराजांची पाद्यपूजा, आशिर्वचन, फल मंत्राक्षता आणि स्वामीजींचे पर्तगाळीला प्रस्थान. सायंकाळी 6.30 वा. ‘स्वर बरसात’ संगीत रजनी. गायक ः गौतमी हेदे बांबोळकर आणि अक्षय नाईक. सूत्रसंचालन ः मानसी वाळवे.









