दलित संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : महाराष्ट्रातील नांदेडजवळ भंडोरा या गावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणातील संशयितांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी जयभीम सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली. त्यांच्या घटनेवरच देशाची वाटचाल चालली आहे. असे असताना त्यांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या तरुणाचा खून करण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. लोकशाहीमध्ये अशा प्रकारे खून होत असेल तर देशाची वाटचाल कोठे चालले, हे दिसून येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिल्यांदाच या गावामध्ये जयंती साजरी करण्यात आली होती. कोणालाही न विचारता ही जयंती साजरी केली म्हणून त्याचा खून करण्यात आला. तेव्हा संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी काशिराम चव्हाण, पी. एल. रजपूत, यमनाप्पा गडीनायक, आशा चुबाची, दीपक मेत्री, रुद्राप्पा हलगेकर, आर. एल. लोकले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









