चंदीगढ / वृत्तसंस्था
पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँगेसचे दलित नेते चरणजितसिंग चन्नी हे भाजपच्या वाटेवर आहेत, असे वृत्त आहे. पंजाबमध्ये काँगेसमध्ये जोरदार वादावादी सुरु असून लवकरच पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नवज्योतसिंग सिद्धू आता कारागृहातून बाहेर आल्यामुळे पक्षांतर्गत बंडाळीला ऊत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यातील काँगेसमध्ये अनेक सत्ताकेंद्रे निम् झाली असून दिल्लीतील काँगेस नेतृत्वाचे नियंत्रण राज्य शाखेवर नाही, अशी स्थिती दिसून येत असल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.
अद्याप चरणजितसिंग चन्नी यांच्याकडून या वृत्ताला दुजोरा दिला गेलेला नाही. त्यामुळे सध्या हे वृत्त अनधिकृत मानले जात आहे. मात्र, चन्नी आणि सिद्धू यांच्यातील उभा दावा पाहता सिद्धू यांचे वर्चस्व पक्षात निर्माण झाल्यास चन्नी आणि त्यांचे समर्थक पक्षत्याग करुन भाजपमध्ये येतील अशी जोरदार चर्च आहे. चन्नी यांनी राहुल गांधीच्या पदयात्रेतही सहभाग घेतला होता. तथापि, तेथेहीभे त्यांना फार महत्व मिळाल्याचे दिसून आले नाही. सिद्धू यांनीही कारागृहातूत बाहेर आल्यानंतर गांधींची भेट घेऊन जवळीक दाखवून दिली. यानंतर पंजाब काँगेसमधील अंतर्गत वादावादीस आणखी बळ प्राप्त झाल्याची चर्चा आहे.









