वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जुलै महिन्यात अफगाण आणि बांगलादेश यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका बांगलादेशमध्ये खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी अफगाण क्रिकेट मंडळाने घोषित करण्यात आलेल्या 19 सदस्यांच्या संघामध्ये 5 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या अफगाणच्या वनडे संघामध्ये वेगवान गोलंदाज सलिम शफी, वफादार मोमांद, इजरुलहक्क नावेद अब्दुल रेहमान आणि झिया उर रेहमान अकबर हे पाच नवे चेहरे आहेत. अफगाणचा संघ चितगाँगमध्ये बांगलादेश बरोबर हे 3 वनडे सामने, 5, 8 आणि 11 जुलैला खेळणार आहेत. अफगाण संघामध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज सय्यद अहमद, सिरजादचे पुनरागमन झाले आहे. फिरकी गोलंदाज रशिद खान आणि फरुकी यांचाही समावेश आहे. ही वनडे मालिका संपल्यानंतर अफगाणचा संघ बांगलादेश बरोबर टी-20 चे 2 सामने खेळणार आहे.
अफगाण संघ – हशमतउल्ला शाहिदी (कर्णधार), रेहमत शहा, गुरबाज, इक्रम अलीकहील, रियाज हसन, इब्राहिम झेद्रान, नजिबूल झेद्रान, महोम्मद नबी, एस. कमाल, रशिद खान, ओमर झाई, रशिद खान, अझमतूल्ला ओमरझाई, मुजिब उर रेहमान, एफ फरुखी, झीया उर रेहमान अकबर, इझरुलहक्क नावेद, अब्दुल रेहमान, वफादार मोमंद, सलिम सफी आणि सैय्यद अहमद शीरझाद.









