मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवसेना वर्धापन दिनी संकल्प
प्रतिनिधी / मुंबई
मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आली असून यंदाचे 57 वे वर्षे महत्त्वाचे आहे. गेले वर्ष शिवसेनेसाठी अभूतपूर्व असे वर्ष होते. गेल्या वर्षी 20 जून रोजी क्रांतीला सुऊवात केली. या उठावाची जगभराने दखल घेतली. आणि 30 जून रोजी शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. म्हणून हा गौरवाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. तरी आजही तेच टोमणे तेच आरोप आमच्यावर होत आहेत. किमान त्यांना स्क्रिप्ट रायटर्स तरी बदलायला कोणीतरी सांगा. मात्र या आरोपांचे उत्तर कामातून देणार असल्याचा प्रतिवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. गोरेगाव येथील नॅस्कोत उभारलेल्या भव्य मंडपात शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन सोमवारी साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
गेले अकरा महिने बाळासाहेबांच्या तसेच धर्मवीरांच्या शिवसेनेला साथ देवून एकजूट दाखवल्याबद्दल आभार मानताना मुख्यमंत्र्यांनी सर्वांना व्यासपीठावऊन दंडवत घातला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून धर्मवीर आनंद दिघे यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी भाषाणाला सुऊवात केली. शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, आरोप झाले तरी काम करत राहायची शिकवण बाळासाहेबांनी आणि आनंद दिघे यांनी आम्हाला दिली आहे. शिवसेना कितीतरी जणांच्या कष्टातून, रक्तातून मोठी झाली. त्याच कष्टकऱ्यांना तुम्ही आज हिणवत आहात काय, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. याच कष्टकऱ्यांना घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना मोठी केली. बाळासाहेबांची डरकाळी फुटली तर अख्खा देश स्तब्ध व्हायचा. सेनेसाठी कित्येकांनी घरादारावर तुळशी पत्र ठेवले. कुटुंबांची पर्वा केली नाही. कितीतरी जणांचे खून झाले तर कित्येकजणांनी जेल भोगले, यात तुम्ही कुठे होता, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. स्वत: मुख्यमंत्री शिंदे शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास झाला, तो बाळासाहेब आणि दिघे सांहेबांच्या आशिर्वादाने असे शिंदे म्हणाले.
मी बदललो नाही :
आपण मुख्यमंत्री असलो तरी अजिबात बदललो नसून यापुढेही मी बदलणार नाही. उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. गद्दार दिवस म्हणून साजरा करण्याचा आरोप होत आहे. तुम्हीच सत्तेसाठी, स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार सोडला, असा आरोप त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. गद्दारी तुम्ही केली. आमच्यावर गद्दारचे आरोप करत आहात. त्यामुळे तुम्हाला सहानुभूती मिळणार नाही. विचारांशी द्रोह केला म्हणून सहानुभूती मिळणार नाही. बाळासाहेबांनी दूर ठेवले होते, त्यांच्यासोबत सरकार बनवले. आम्ही चुकीचे केले असते तर 50 आमदार कार्यकर्ते दिसले असते का, असा प्रश्न सवाल त्यांनी उपस्थित केला. इकडे आला तो कचरा असेल तर एक fिदवस तुमचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही शिवसेना वाचवली. गहाण टाकलेला धनुष्यबाण सोडवला. सरकार कोण चालवत होते ते तुम्हाला माहीत आहे. सरकार कोणाचे आणि चालवत कोण हाते असेच चालले असते तर आपण राज्यात हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेही राहिलो नसतो. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि नाव दिले. सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्कामोर्तब केले आहे. सरकार काय पडत नाही. किती खोटारडेपणा, दिशाभूल करायची. मुख्यमंत्री शेती करायला हेलिकॉप्टरने शेती करायला जातो असा आरोप होत आहे. क्शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॅप्टरमध्ये बसू नये काय. गावात गेल्यावर शेती करतो, शेतकरी म्हणून. सरकार चालवायचे सोडून गाडी चालवत होतात. गाडीतून जाताना मी फाईलीवर सही करतो. गेल्या अडीच वर्षात झाल्या नाहीत तेवढ्या मी एका दिवसात सह्या केल्या. माझ्याकडे दोन पेन आहेत. गेल्या मुख्यमंत्र्यांनी किती सह्या केल्या. गेल्या काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे 2 कोटी वाटले तर मी ते 75 कोटी वाटले आहेत.








