प्रदूषण रोखण्यासाठी केजरीवाल सरकारचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली सरकारने हिवाळ्यात प्रदूषण पातळी कमी करण्याच्या कृती योजनेचा एक भाग म्हणून राष्ट्रीय राजधानीत सर्व प्रकारच्या फटाक्मयांची निर्मिती, विक्री, साठवणूक आणि वापरावर पुन्हा बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सोमवारी ही माहिती दिली. शहरात ही बंदी लागू करण्यासाठी दिल्ली पोलिसांना कडक सूचना देण्यात येतील, असे राय यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
दिल्ली सरकार गेल्या तीन वर्षांपासून सर्व प्रकारच्या फटाक्मयांवर बंदी घालत आहे. दिवाळीनंतरच्या दोन-तीन महिन्यात दिल्लीसह आजूबाजूच्या राज्यांमध्ये प्रदुषणाची पातळी वाढलेली दिसून येते. ही पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दिल्ली सरकारने आतापासूनच कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेत बरीच सुधारणा पाहिली आहे, परंतु आम्हाला त्यात आणखी सुधारणा करायची असल्याने यावषीही फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, असे राय यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारने गेल्यावषी फटाकेबंदीचा नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश देताना दंडात्मक कारवाईची घोषणा केली होती. दिवाळीत शहरात फटाके फोडल्यास सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 200 रुंपये दंड आकारण्यात आला होता. तसेच स्फोटक कायद्याच्या कलम 9 बी अंतर्गत दिल्लीत फटाक्मयांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री दंडनीय ठरवून 5,000 रुंपयांपर्यंत दंड आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल, असेही जाहीर करण्यात आले होते.









