पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंह, पंकज त्रिपाठी आणि ऋचा चड्ढा यांचा चित्रपट ‘फुकरे 3’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. फुकरे 3 या चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदीप सिंह लांबा यांनी केले असून हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पुन्हा एकदा हनी (पुलकित सम्राट) आणि चूचा (वरुण शर्मा) हे शाळेत नापास होण्याच्या वाटेवर असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. ‘फुकरे’ या चित्रपटात भोली पंजाबन (ऋचा) तुरुंगात गेली होती. तर ‘फुकरे रिटर्न्स’मध्ये सूड उगविण्यासाठी तिने केलेल्या कारवाया दाखविण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा भोली पंजाबन आणि चूचा, हनी, लाली आमने-सामने आहेत. परंतु यावेळी ‘जफर भाई’ हे पात्र दिसून येणार आहे. भोली पंजाबन निवडणूक लढविताना दाखविण्यात आली असून तिच्या विरोधात चूचा अन् हनी देखील पंडितजीच्या (पंकज त्रिपाठी) मदतीने निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. फुकरे 3 या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी केली आहे. तर चित्रपटाची कथा विपुल विग यांनी लिहिली आहे.
Previous Articleदिवाळीत दिल्लीत फटाक्यांवर बंदी
Next Article चंद्राबाबूंच्या अटकेविरोधात तेदेपकडून बंदची हाक
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









