रत्नागिरी
कोकणाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खूप प्रेम केले. बाळासाहेबांचे विचार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेवून जात आहेत. म्हणूनच मोठ्या संख्येने ‘उबाठा’चे लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. उबाठाकडून आता बैठका घेतल्या जात आहेत. हेच जर निवडणुका झाल्यावर लगेचच त्यांनी आत्मचिंतन केले असते तर काल जो प्रसंग रत्नागिरीत उभा राहिला तो राहिला नसता. मोठ्या प्रमाणात पक्षाला खिंडार पडलेनसते, अशी टीका पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.
मिरजोळे एमआयडीसी विश्रामगृह येथे सामंत पत्रकारांशी बोलत होते. एकनाथ शिंदे हे सामान्य कार्यकर्त्याला मोठे करणारे नेते आहेत. म्हणूनच कालच्या सभेत ‘राजा का बेटा, राजा नही बनेगा’ असे वक्तव्य शिंदे यांनीकेले. कार्यकर्त्याचे पाय छाटायचे नसतात तर त्याला ताकद देवून उभे करायचे असते. कार्यकर्त्यांना उभे करायचे काम एकनाथ शिंदे करत आहेत. याचे उदाहरण म्हणजे रामदास कदम हे आहेत, असे सामंत यांनी यावेळी सांगितले.








